नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
आज दि. 24 डिसेंबर रोजी “ ग्राहक संरक्षण कायदा ” अंमलात आला असल्याने त्यास अनुसरून प्रत्येक वर्षी 24 डिसेंबर हा दिवस ” राष्ट्रीय ग्राहक दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. शासनाकडून दि. 24 डिसेंबर 2022 रोजी “राष्ट्रीय ग्राहक दिन” साजरा करणेबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत. या वर्षी साजरा करावयाच्या ग्राहक दिनासाठी “Effective disposal of cases in Consumer Commissions ” ही संकल्पना (थीम) निश्चित करणेत आली आहे.
दि. 24 डिसेंबर 2022 चा राष्ट्रीय ग्राहक दिनाचा जिल्हा स्तरीय कार्यक्रम नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित करणेत आला आहे. या कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी जळगाव आणि मा. अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून या वर्षाच्या ग्राहक दिनाच्या संकल्पनेबाबत विशेष पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करणेत आले असुन त्याचे सादरीकरण या प्रसंगी करणेत येईल. ग्राहक प्रबोधनाचे पथनाट्याचे सादरीकरण देखील या प्रसंगी होईल. जिल्हा पोलिस विभागाचे सायबर सेलचे तज्ञ मार्गदर्शक यावेळी सायबर गुन्हे टाळण्यासाठी घ्यावयाच्या
दक्षतेबाबत मार्गदर्शन करतील. तालुकास्तरावर देखील राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम आयोजित करणेबाबत सूचना जिल्हा
प्रशासनाकडून सर्व तालुक्यांना देणेत आल्या आहेत.
आज माध्यमिक / महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेले विद्यार्थी देखील ग्राहक आहेत. विद्यार्थी वर्ग सोशल मिडीयावर सक्रीय असतो. ऑनलाईन शॉपिंगमध्ये विद्याथ्र्यांचा ग्राहक म्हणून सहभाग वाढत आहे. ब-याचवेळा ग्राहकांची ऑनलाईन अथवा स्थानिक स्तरावरून वस्तू खरेदी करतांना फसवणूक होण्याची शक्यता
असते. या फसवणूकीपासून कसे सावध रहावे, काय खबरदारी घ्यावी फसवणूक झालीच तर कोणत्या यंत्रणेकडे दाद मागावी याची माहिती ग्राहकास असणे आवश्यक आहे. यासाठी ग्राहक प्रबोधनाचे कार्यक्रम महाविद्यालयीन /माध्यमिक शालेय स्तरावर आयोजित करणेबाबत जिल्हा प्रशासनाकडून कुलसचिव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व् शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. जळगाव यांना सूचना देणेत आल्या आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेसबुक पेजवरून ( JalgaonDM) या कार्यक्रमाचे प्रसारण दि. 24 डिसेंबर, 2022, सकाळी 09:30 वा.
करणेत येईल.