अमळनेर बस स्थानक परिसरातुन अवैद्यरित्या गांजा वाहतूक करणाऱ्यास पोलिसांनी केले अटक .

15 किलो 566 ग्रॅम वजनाचा किं.रु.2,30,000/-रूपए  किमंतीचा गांजा जप्त

अमळनेर येथील् कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे यांना मिळालेल्या गोपणीय माहिती नुसार दिनांक 22/12/2022 रोजी अमळनेर शहरात बस स्थानक परीसरात दोन इसम राधेशाम रामसिंग पावरा व्  सुरेश साहेबराव भदाणे दोन्ही रा. हिसाळे ता. शिरपुर जि. धुळे हे त्यांचे स्वतःचे फायदयाकरीता गैरकायदा 15 किलो 566 ग्रॅम वजनाचा किं.रु.2,30,000/-रूपए  किमंतीचा गुंगी आणणारा गांजा ओलसर काळे पत्तीचा मादक पदार्थ विक्री करण्याचे उददेशाने कब्जात बाळगुन वाहतुक करीत असतांना मिळुन आले आरोपी  सुरेश साहेबराव भदाणे  हा पोलीसांची चाहुल लागताच पळुन गेला म्हणुन सफौ/1086 राजेंद्र कोठावदे याचे फिर्याद वरुन अमळनेर पोलीस स्टेशनला NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई मा.पो. अधिक्षक श्री. एम रामकुमार सो. मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. रमेश चोपडे सो व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राकेश जाधव सो. यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे साहेब स्वता समक्ष व त्यांचे पथकातील सफौ. राजेंद्र कोठावदे, पोहेकाँ.किशोर पाटील, पोना.दिपक माळी, पोना. रविंद्र पाटील, पोना . मिलींद भामरे, पोना. सुर्यकांत साळुखे, पोना. सिंध्दात सिसोदे, पोकाँ.हर्षल पाटील, पोकाँ. विलास बागुल, व पंच  श्री प्रदीप अशोक भदाणे रा. वजीरखेडे ता.मालेगांव (तलाठी-मुडी ता. अमळनेर), निलेश अशोक पवार रा. आदर्श नगर, चोपडा, फोटोग्राफर सागर राजेंद्र पाटील, व तराजु मापक रोहन जगदीश आठवले अश्यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास
. पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे हे करत असुन आरोपी  राधेशाम रामसिंग पावरा रा. हिसाळे ता. शिरपुर जि. धुळे यांस मा. न्यायालयात समक्ष हजर केले असता मा.न्यायालयाने आरोपीस  तिन् दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.पुढील तपास
पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे साहेब करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]