अमळनेर तालुक्यात बहुसंख्य ग्रा.पं.
वर आमचाच झेंडा असल्याचा
राजकीय नेत्यांचा दावा…

अमळनेर:- तालुक्यातील 20 ग्रामपंचायतींचे
निकाल काल जाहीर झाले असून यात अनेक
ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला आहे व
नव्यांना जनतेने संधी दिली आहे. सुंदरपट्टी येथे
सुरेश पाटील यांना क्लीन स्वीप तर भिलाली येथे
पावभा पाटील यांच्या पराभवाची चर्चा सर्वाधिक
होती.
तालुक्यातील कन्हेरे येथे लोकनियुक्त सरपंचपदी
चंद्रकांत अरुण नेरकर, आमोदे सरपंचपदी रजनी
सुरेश पाटील, इंदापिंप्री सरपंचपदी रवींद्र भिला भील,
मारवड सरपंचपदी आशा सुभाष भील, मुंग
सरपंचपदी शोभा निलेश कोळी, रुंधाटी सरपंचपदी
मालुबाई धनराज पवार, कामतवाडी सरपंचपदी
भगवान पितांबर पाटील, नगाव खु. सरपंचपदी
सरला चंद्रकांत जगदाळे, नगाव बु. सरपंचपदी
सरिताबाई पद्माकर गोसावी, कोंढावळ सरपंचपदी
भूषण गुलाबराव पाटील, जानवे सरपंचपदी सरला
प्रकाश पाटील, गंगापुरी सरपंचपदी सुदर्शन वसंत
पाटील, भिलाली सरपंचपदी महेन्द्रसिंग भटेसिंग
राजपूत, वावडे सरपंचपदी कोकिलाबाई प्रल्हाद
पाटील, डांगर सरपंचपदी प्रकाश रंगराव वाघ,
जैतपिर सरपंचपदी संगीता महेंद्र पाटील, सुंदरपट्टी
सरपंचपदी अर्चना प्रेमराज पाटील, तासखेडे
सरपंचपदी कल्पणाबाई सुनील पाटील, हेडावे
सरपंचपदी मनीषा भास्कर पाटील, खापरखेडा
सरपंचपदी सुनील मंसाराम पाटील यांची निवड
झाली आहे.

राजकीय नेत्यांचा आकड्यांचा खेळ, आमचेच जास्ती
असल्याचा दावा….
स्मिता वाघ यांनी 16 ग्रामपंचायतीवर भाजपाचा
विजय झाल्याचा दावा केला. राष्ट्रवादीने 13
ग्रामपंचायतीवर विजयी झाल्याचा दावा केला.
काँग्रेसकडून ही काही गावांवर दावे करण्यात आले.
आपल्या फडात येवून नवनिर्वाचित सदस्यांनी
सत्कार स्वीकारला म्हणजे आपला विजय अशी
गोळाबेरीज राजकीय नेते करत असावेत. मात्र
ग्रामपंचायत निवडणूक ही गावातील समीकरणे,
सामाजिक व आर्थिक बाबी यांवरच लढविल्या
जातात. मात्र या दाव्यावरून रा. कॉ. व भाजपा मध्ये
कलगीतुरा रंगला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]