अध्यक्ष केबिन मधील एकनाथराव खडसे यांच्या फोटो काढला.
जळगांव दि.18 :- येथील जिल्हा दूध संघाची
निवडणूक नुकतीच पार पडली होती.त्यात
शेतकरी विकास पॅनल ने एकहाती सत्ता
मिळविली होती. आज रविवार रोजी
संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत
चाळीसगांव चे आमदार मंगेश चव्हाण यांची
अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात
आली.
ना.गिरीश महाजन व पालकमंत्री
गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली
झालेल्या दूध संघाच्या निवडणुकीत
शेतकरी विकास पॅनल ने एकहाती सत्ता
मिळवली होती. निवडणूक झाल्यानंतर
संचालक मंडळाची पहिली बैठक आज
रविवार रोजी सकाळी पार पडली. त्यात
अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. अध्यक्ष
पदासाठी आ.मंगेश चव्हाण यांचा एकमेव
अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड
संचालक मंडळाने केली. आ. मंगेश चव्हाण
यांनी अध्यक्ष पदाची धुरा सकाळी
सांभाळली. दूध संघाच्या अध्यक्ष केबिन मध्ये
लावलेला एकनाथ खटये यांचा फोटो नूतन
अध्यक्षांनी खाली उतरविला.