लोंढवे येथील आबासो.एस.एस.पाटील विद्यालयाची शैक्षणिक सहल ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन पडली आनंदात पार.

अमळनेर:- तालुक्यातील लोंढवे येथील आबासो
एस . एस. पाटील विद्यालयाची शैक्षणिक सहल
ऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन उत्साहात
पार पडली. तीन दिवसाच्या या सहलीत विद्यार्थ्यांनी
ऐतिहासिक स्थळांचा अभ्याससह प्रेक्षणीय स्थळांवर
सहलीचा आनंद लुटला.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कोरोनामुळे शालेय
सहली बंद होत्या. आता कोरोनाचे संकट दूर
झाल्याने शाळा पूर्ववत सुरू झाल्या आहेत. त्यामुळे
शाळांच्या शैक्षणिक सहली काढण्यात येत आहे.
लोंढवे येथील आबासो बी.एस.पाटील विद्यालयाची
शैक्षणिक सहल नुकतीच पार पडली ही सहल
अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, भद्रा मारुती, औरंगाबाद
प्राणी संग्रहालय, बीबी का मकबरा, शिवाजी
म्युझियम, पैठण, जायकवाडी धरण, एकनाथ
महाराज वाडा व समाधी, साखर कारखाना, शिर्डी
दर्शन, वॉटर पार्क, साई तिर्थ येथे पार पडली. या
सहलीत लोंढवे शाळेची शैक्षणिक सहल उत्साहात
संपन्न झाली. यावेळी इयत्ता 8 वी, 9 वी आणि 10
वीचे एकूण 60 मुले आणि मुली सहभागी झाल्या
होत्या. या संपूर्ण सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी खूपच
धमाल केली. मुख्याध्यापक बाळासाहेब जीवन
पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहलीचे आयोजन
करण्यात आले होते. यात शाळेतील शिक्षकांसह
हल प्रमुख व्ही. डी. पाटील, आर. पी. पाटील, भारती
बहिरम, मनोहर देसले, एम. जे. पाटील, पी. पी.
पाटील, प्रमोद बहिरम, जे. एच. ठाकूर, प्रदीप पाटील,
दिलीप पाटील, प्रगती पाटील उपस्थित होते. या
सहलीत तीन दिवस विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक

किल्ल्याची पाहणी करून त्याची सखोल माहिती
जाणून घेतली. तसेच प्रेक्षणीय स्थळी स्वतसह मित्र,
शिक्षकांसोबत सेल्फी घेत आनंद लुटला. तेथील
प्रसिद्ध पदार्थांवर ताव मारला. प्रवासात गाडींमध्ये
अंताक्षरी, विविध गाणी गात तीन दिवस सहलीचा
आनंद लुटत धमाल केली. पुढच्या वर्षी पुन्हा अशाच
सहलीत सहभागी होण्याचा मानसही विद्यार्थ्यांनी या
वेळी बोलून दाखवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]