वावडे येथील तरुणाने
लोण शिवारात गळफास घेवून संपविली जीवनयात्रा

आत्महत्येचे कारण. स्पष्ट नाही, अकस्मात मृत्यूची
नोंद….

अमळनेर:- तालुक्यातील वावडे येथील एकाने
लोण शिवारात गळफास घेवून जीवनयात्रा
संपविल्याची घटना काल 14 डिसेंबर रोजी घडली
आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वावडे येथील
दिलीप भाईदास मैराळे (वय 33) याने संध्याकाळी
5 वाजेच्या सुमारास लोण बू. शिवारात रोडच्या
बाजूला शेतात चिंचेच्या झाडाला वायरने गळफास
लावल्याची माहिती मिळाल्याने गावातील लोक
त्याठिकाणी पोहचले. त्यास खाली उतरवून
अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता
डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. मयत दिलीप
मैराळे याचा बँडचा व्यवसाय होता व कुणाल
म्युझिक नावाने तो ग्रामीण भागात चांगलाच
परिचित झाला होता. आत्महत्येचे कारण अद्याप
स्पष्ट झालेले नसून दिलीप पाटील यांच्या
फिर्यादीवरून मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची
नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस
करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *