महापुरुषां बद्दल आकस बुध्दीने अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या उच्च तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वर कायदेशीर कारवाई करा..

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरगट यांनी केली मागणी

अमळनेर येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट यांनी चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांच्या बद्दल अपमानास्पद भाषेचा वापर केल्याच्या विरोधात मोर्चा काढून केली कारवाईची मागणी.

क्रांती सुर्य महात्मा ज्योतीराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर व कर्मविर भाऊ रावजी पाटील या महापुरुषांनी आपले संपूर्ण आयुष्य लोक शिक्षणासाठी पणाला लावून त्यांच्या या कार्याला समाजाने उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देवून लोकसहभागातून शैक्षणिक
चळवळ त्या काळात अधिक व्यापक केलेली होती. बहुजन समाजातील व गरिब मुलांना मोफत शिक्षण मिळावे व ते उच्च शिक्षित होवून सुज्ञ नागरीक व्हावे यासाठी समाजानेही उत्स्फुर्त सहभाग घेतला. या माध्यमातून कोटयावधी मुलांना शिक्षण मिळाले. आज महाराष्ट्र शिक्षणामध्ये शैक्षणिकदृष्टया अग्रेसर दिसतो आहे. त्यामागे या महापुरुषांचे कार्य व मोलाचे योगदान आहे.एवढा खरा शैक्षणिक इतिहास असतांना आकस बुध्दीने खेदजनक व अपमानास्पद वक्तव्य उच्च तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी पेठण येथील संमेलनात केले. हे विधान अत्यंत दुदेवी व समाजामध्ये महापुरुषांबद्दल गैरसमज पसरविण्याचा हेतु पुरस्कर प्रयत्न केला जात आहे.
महापुरुषांचा अपमान सहन न झाल्यामुळे निषेध म्हणून शाई फेक करणाऱ्या तसेच पत्रकार व फोटोग्राफर यांच्यावर दाखल केलेले खोटे कलम मागे घेण्यात यावे. तसेच संरक्षण सेवेत सेवा बजाविणारे
निलंबीत पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेत घेण्यात यावे आदी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट यांनी मोर्चा काढून अमळनेर प्रांतधिकारी यांना निवेदन देऊन केली मागणी.

याप्रसंगी यशवंत बैसाणे, पितांबर वाघ,ऍड अभिजित बिऱ्हाडे,अरुण घोलप, प्रवीण संदानशीव संदीप नगराळे, अर्जुन सदानशिव, आदी सह अनेक समाज बांधव मोर्चात उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *