आज ०६ डिसेंबर महापरिनिर्वान दिन
भारतीय संविधानाचे शिल्पकार, मार्गदाते, विध्वत्तेचे महामेरू, विश्वरत्न,भारतरत्न,महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर याना ०६ डिसेंबर महापरिनिर्वान दिना निमित्त त्यांच्या क्रांतिकारी विचारांना आणि पवित्र स्मृतीला तसेच त्यांच्या पवित्र प्रतिमेला विनंम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील उपशिक्षिका श्रीमती. एस. जी बैसाणे मॅडम यांनी केले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडला व त्यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य विद्यार्थ्यांना सांगितले या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.आर.बी.पाटील सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण गुण पुस्तक वाचनाचा विद्यार्थ्यांसमोर विशद केला ज्या महामानवाने पुस्तकांसाठी राजगृह निर्माण केले त्याचप्रमाणे मुलांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुण अंगीकरून दोन तास पुस्तक वाचन करावे हीच खरी डॉ. बाबासाहेबांना आदरांजली ठरेल ह्या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.एस.ए.पाटील सर यांनी केले.