????????????
हरभरा पिकासाठी पाणी व्‍यवस्‍थापन कसे करावे

????????????
हरभरा पिकासाठी पाणी व्‍यवस्‍थापन कसे करावे


हरभरा पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असणारे पीक आहे. हरभरा पिकाला साधारणपणे 25 सेंमी पाणी लागते. पेरणी झाल्यानंतर एक हलके पाणी द्यावे. त्यामुळे उगवण चांगली होते. मध्यम जमिनीमध्ये सुमारे 25 ते 30 दिवसांनी पहिले पाणी, 45 ते 50 दिवसांनी दुसरे पाणी आणि आवश्यकता वाटल्यास तिसरे पाणी 65-70 दिवसांनी द्यावे. जमिनीच्या मगदुरानुसार आणि आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. जमिनीत भेगा पडण्यास सुरू होण्याआधी पाणी द्यावे. मोठया भेगा पडल्यानंतर पाणी दिल्यास खूप पाणी बसते आणि अति पाण्यामुळे हरभरा उमळून जातो. पिकात पाणी साचून राहिल्यास मूळकुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते. हरभरा पिकास एक पाणी दिल्यास 30 टक्के उत्पादनात वाढ होते. दोन पाणी दिल्यास 60 टक्के वाढ होते आणि तीन पाणी दिल्यास उत्पादनात दुप्पट वाढ होते. हरभरा पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असे पीक आहे. हरभरा पिकास फुलोरा ते दाणे भरण्‍याचा कालावधीत पाण्‍याची जास्‍तीत जास्‍त आवश्‍यकता असते. हरभरा पिकाच्‍या पाणी देण्‍याच्‍या 2 मुख्‍य अवस्‍था आहेत. एक म्‍हणजे फांद्या फुटताना व दुसरे घाटे भरताना पाण्‍याच्‍या पाळ्या देणे गरजेचे असते. सिंचनाची जरी व्‍यवस्‍था असेल तरी अतिशय हलके पाणी या पिकास द्यावे.
पाणी देण्‍याच्या आधुनिक पद्धती
हरभरा पिकास पाणी देण्‍याच्‍या प्रचलित पद्धतीच्‍या तुलनेत तुषार सिंचन व ठिबक सिंचन पद्धतींना अनन्‍यसाधारण महत्‍त्‍व आहे. आधुनिक पद्धतीमुळे कमी पाण्‍यात जास्‍त क्षेत्र ओलिताखाली आणता येते. आधुनिक पद्धतीमध्‍ये तुषार सिंचनात अंदाजे 25-30 टक्‍के तर ठिबक सिंचनात अंदाजे 35-45 टक्‍के पाण्‍याची बचत होते. पीक उत्‍पादनात अंदाजे 15-20 टक्‍के वाढ होते. पाण्‍यासोबत खते देता येतात. आधुनिक सिंचन पद्धतीमुळे पिकांना प्रमाणशीर पाणी देणे शक्‍य झाले आहे.
हरभरा पिकांतील तुषार सिंचन द्वारे पंपाच्या साहाय्याने बुरशीनाशक मिसळून आवळणी करावी किंवा nutri growth + k rot किवा F CLEAR बुरशीनाशक 25दिवसाणी तुषार ने पाणी देण्याच्या अगोदर शिंपडून पाणी द्यावे हरभरा पिकांतील मर रोगाला बळी कमी पडतो आणि उत्पादनात वाढ निश्चित मिळते. तसेच जेव्हा जमिनीत ओलावा असते तेव्हा फवारणी घेणे आवश्यक आहे
ठिबक सिंचन द्वारे
आता जोड ओळ पद्धतीने हरभरा पिकांची लागवड किंवा दोन बेड वर दोन तास पेरणी करावी व मधील दिड फुटापासून ते 3फुटा पर्यंत बेड मारून ठिबक ने पाणी देता येते ठिबक ने सुरूवातीच्या काळात बुरशीनाशक मिसळून आवळणी करता येते त्यामुळे मर रोग व तिन फुट सर्व पट्टा मिळतोय आणि उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात वाढ होते‌….







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *