अमळनेर येथे श्री विजय शिंदे पोलीस निरीक्षक म्हणून रुजू

अमळनेर – माननीय श्री पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी आपल्या चमकदार कामगिरीने अल्पावधीतच आपल्या कामाचा ठसा हा संपूर्ण शहरासह अमळनेर तालुक्यात उमटविला होता. अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी शहरात व तालुक्यात वचक निर्माण करून सामाजिक सलोखाही जपला होता. त्यांच्या कामाची पावती अमळनेरकरानी तसेच तालुक्यातील जनसामान्यांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष भेटून मान सन्मानाने त्यांना दिलेलीच होती. अशा या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे बदली झाली. त्यांच्या जागी रामानंद पोलीस स्टेशनचे श्रीयुत विजय शिंदे हे रुजू झाले असून त्यांनी गुरुवारीच आपला पदभार स्वीकारला आहे. माननीय पोलीस निरीक्षक श्रीयुत विजय शिंदे यांच्यावर आता अमळनेर पोलीस ठाण्याचा पदभार असून अमळनेर व तालुक्यातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्याचे काम ते अत्यंत चोखपणे पार पाडतील. शहरात कायदा व सुव्यवस्था चोखपणे बजावतील अशा अपेक्षा अंमळनेरकराना त्यांच्याकडून आहे व ती जबाबदारी ते चोखपणे पार पाडतीलच यात कुठलीही शंका नाही.