अमळनेर परिषद सफाई कामगाराचे असाही प्रामाणिकपणा;5 ग्रामची सोन्याची अंगठी केली परत..
कामगार विक्की वानखेडे यांच्या वर सर्वत्र कौतुकाच्या वर्षाव…
अमळनेर: नगरपरिषदेच्या बाबतीत अनेक प्रामाणिकपणाचे उदाहरण समोर आली आहेत. त्यात अजून एक प्रामाणिकपणाच्या प्रसंग समोर आला आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या सफाई कामगारांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शहरातील वार्ड क्रमांक 12 मधील ब्रम्हे गल्ली येथील गटार/सफाई कामगार विक्की वानखडे गटार काढत असताना अचानक सोन्याची अंगठी दिसली; काढून बघितला असता ती 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असल्याचे समजले, ही गोष्ट कोणालाही माहीत नव्हती. परंतु थोड्याच वेळात ज्या आजीची अंगठी होती; ती आजी घाबरलेल्या अवस्थेत कामगार विक्की वानखेडे यांना काम करत असताना विचारले की,दादा माझी सोन्याची अंगठी या परिसरात हरवलेली आहे, सापडली तर द्या हो !!! विक्की याने कुठलीही गोष्टीचा विलंब न लावता, प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत सोन्याच्या अंगठी स्वच्छ करून त्या आजींना परत केली. घाबरलेल्या आजीने निश्चित होत कामगाराचे आभार मानले.
स्वार्थ प्रत्येक ठिकाणी महत्त्वाचे नसतो. ही गोष्ट अमळनेर परिषदेचे गटार कामगार यांनी दाखवून दिले. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.