अमळनेर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या जन्मदिवसानिमित्त शेतकऱ्यांनी सप्त धान्य दिली तर बाजार समितीतर्फे मिठाई तुला करण्यात येऊन शेतकरी व हमाल मापाडी गुमास्ता यांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभार विकासाच्या दिशेने यशस्वीपणे अशोक पाटील नेत आहेत असे गौवोद्गार उदगार याप्रसंगी शुभेच्छा देताना पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.अनिल पाटील यांनी काढले. यावेळी बाजार समितीचे उपसभापती सुरेश पिरन पाटील, भरवस येथील शेतकरी कार्यकर्ते डॉ रामराव पाटील, कृ उ बा संचालक प्रकाश अमृतकर, मूडी येथिल सामाजिक कार्यकर्ते गुणवंत पाटील,शिक्षक सुजित पाडवी,गोविंदा महाजन आदिनी आपल्या भाषणातून अशोक पाटील यांच्या ग्राम विकासाच्या व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासह शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून होणाऱ्या कार्याचा गौरव करीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. बाजार समितीतर्फे अशोक पाटील यांच्या वजना इतकी मिठाई तोलून “मिठाई तुला” करण्यात आली तर सदर मिठाई उपस्थित शेतकरी व हमाल मापारी यांना वाटण्यात आली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव व कर्मचारी वृंद , व्यापारी मंडळी यांच्यातर्फे केक कापण्यात आला तर बाजार समितीत आलेल्या शेतकऱ्यांच्या वतीने सप्त धान्याची रास देऊन अशोक पाटील यांचा गौरव करण्यात आला. कृवा संचालक सुभाष पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी केले. आभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. उन्मेष राठोड यांनी मानले. यावेळी मा.जि प सदस्या जयश्री पाटील,कृ उ बा संचालक समाधान धनगर ,हिरालाल पाटील,सौ.सुषमा देसले,सौ.पुष्पा पाटील,भाईदास भिल,ऋषभ पारेख, शरद पाटील मा.संचालक हरी भिका वाणी, संजय बितराई ,मा नगरसेवक प्रताप शिंपी, बाळासाहेब संदानशिव, शरद पाटील , गटसचिव संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील,किसन पाटील यांचेसह पत्रकार बांधव,मुख्याध्यापक चंद्रशेखर व्यास, आशिष पवार ,प्रशांत मराठे , समाधान शेलार ,समाधान शिंदे, श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच मुडी मांडळ जिल्हा परिषद गटातील अनेक गावांचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटी संचालक ,शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.