समाजभान असलेले एकमेव उमेदवार डॉ. अनिल शिंदे हेच असल्याची सचिन बाळू पाटील यांची दर्पोक्ती
अमळनेर: निवडणुकीत पराभव समोर दिसू लागल्याने आता समाजाला पुढे करून तालुक्यातील जनतेत फूट पाडण्याचा प्रकार सुरू असून आजी माजी आमदारांनीच तालुक्यात विषमतेचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष व बाजार समिती संचालक सचिन बाळू पाटील यांनी केला आहे.
मतदारसंघात गेल्या दहा वर्षात समाजा- समाजात विष कालवून द्वेष निर्माण करण्याचा प्रकार सुरू आहे. निवडणूक येताच जातीवार मेळावे घेतले जात असून आजी माजी आमदाराच ह्या प्रकाराला जबाबदार आहेत, हे संपूर्ण तालुक्याला ठाऊक असल्याचे सचिन पाटील यांनी सांगितले आहे. या दोन्ही उमेदवारांना पराभव समोर दिसू लागल्याने त्यांना समाज आठवू लागला आहे. मात्र कोणताही समाज ही कोणत्याही उमेदवाराची मक्तेदारी नसून उमेदवारांनी समाजाला गृहीत धरू नये, कारण आता तालुक्यातील जनता सुज्ञ झाली असल्याचे सचिन पाटील यांनी सांगितले.
समाजभान असलेले डॉ. शिंदे एकमेव नेतृत्व डॉ. अनिल शिंदे हेच समाजभान असलेले एकमेव नेतृत्व असून वैद्यकीय व्यवसाय असो वा राजकारण त्यांनी कधीही समाज पाहून भेद केलेला नाही. त्याचवेळी सातच्या मनोज जरांगे यांनी स्वतःच्या मराठा समाजाच्या हक्कांसाठी ते नेहमी पुढे असतात. तालुक्यात मराठा आरक्षण आंदोलनावेळी डॉ. अनिल शिंदे हे सर्वात पुढे होते. ज्येष्ठ असूनही तरुणांच्या बरोबरीने आंदोलनात सहभागी झाले होते. त्यावेळी आजी माजी आमदार गायब झाले होते, आता मात्र ह्या उमेदवारांना आता समाज आठवू लागला असून ठराविक समाज आमच्या बरोबर आहे असे भासवण्याचे प्रकार सुरू आहेत. मात्र कोणताही समाज कोणाचीही मक्तेदारी नसून सर्वच समाजासाठी लढणाऱ्या डॉ. शिंदे यांच्या पाठीशी तालुक्यातील जनतेने राहावे असे आवाहन करत सचिन बाळू पाटील यांनी आजी माजी आमदारांवर तोफ डागली आहे.