अमळनेर:माजी आमदार शिरीष दादा चौधरी प्रत्येक नागरिकाच्या आवाजाची महत्त्वाची भूमिका बजावणारा नेता आहे. अमळनेर तालुक्यातील नेत्यांमध्ये, शिरीष दादा चौधरी यांचे नेतृत्व अद्वितीय आहे, तसेच त्यांच्या विरोधकांना आता भीती वाटू लागली आहे. तालुक्यातील जनतेचा शिरीष दादा चौधरी यांना जनसामान्यातून मिळणारा पाठिंबा ते पुढील आमदार होतील असे दर्शवतो. तसेच अमळनेर शहराचा विकासाच्या संदर्भात, बोलतांना रविंद्र बापू चौधरी यांनी “चांगली बॅटिंग करण्यासाठी आपल्याला योगायोगाने बॅट हे चिन्ह मिळाले आहे.” विधानसभेचे मैदानही जवळ आहे”. आणि आपला विराट कोहली मैदान गाजवण्यासाठी देखील तयार आहे. चाट मारणाऱ्यांची जनता कशी वाट लावेल हे येत्या 23 तारखेला जनता दाखवेलचं यात शंका नाही. पुढे बोलतांना ते असे म्हणाले की, अमळनेर तालुक्यातील विकास कामांचे विश्लेषण म्हणजे अमळनेर शहरात, शाश्वत विकासाचे कोणतेही प्रभावी काम झालेले नाही. मागील काळात झोळीत पैसे जमा करणाऱ्या मंत्र्यांची प्रॉपर्टी 100% ने वाढली असून हा स्वतःचाच विकास आहे. अमळनेर तालुक्यातील शेतकरी,कष्टकरी, वंचित, महिलांच्या समस्या, अमळनेर शहरात होणारी गुन्हेगारी या गोष्टी दुपटीने वाढल्या आहेत.
“आपल्याला सर्वांना शिरीष दादा चौधरी यांना आमदार म्हणून बघायचे आहे”. विरोधकांची भीती वाढीला लागलेली आहे, कारण जनतेच्या पाठिंब्याने अस्वस्थता त्यांच्या मनात घर करायला लागली आहे.यावेळी त्यांनी गेल्या पाच वर्षात विकास कार्ये आणि त्यांच्या पालिकेच्या कार्यकाळात वाढत्या पाणीपट्टीसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले,
यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले की..
अमळनेर तालुक्यातील विकासाचा राजकीय प्रवास गहन आहे आणि मला जनतेने दिलेला पाठिंबा याची पुष्टी करतो. विरोधकांची भीती आणि कार्यकर्त्यांचे एकत्रित प्रयत्न यामुळे तालुक्यातील राजकीय दृश्य बदलत आहे. माझ्यावर असलेला जनतेचा विश्वास आणि पाठिंबा हीच नेत्याची खरी शक्ती असते आणि अमळनेरची जनता हा बदल अनुभवण्यास सज्ज आहे. असे शिरीष चौधरी यांनी आपले मनोगत वेक्त केले.
यावेळी
जळोद सरपंच, ज्ञानेश्वर चौधरी, माजी सरपंच डॉ. जितेन्द्र चौधरी, पातोंडा येथील भोला भाऊ बिरारी, देविदास बापू, सोपान लोहार, निंभोरा अरुण पाटील, आलेश धनगर, हिंगोने सीम फुलचंद कोळी, अमळगाव डॉ. पंकज चौधरी, भुषण चौधरी, निखिल महाले, खवशी सचिन पाटील, राकेश गोसावी, पिंपळी प्रेमा दादा, मनोज महाजन, महेश पवार, राजेंद्र पाटील, सोनु गांगुर्डे, किरण गोसावी, हिरालाल महाराज, पिंटू शिरसाठ, दिपक पाटील कलाली, एन डी तात्या, भागवत पाटील इ. कार्यकर्ते उपस्थीत होते.