राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अमळनेरमध्ये भाजपच्या विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमळनेर (अटकाव न्यूज़) –
अखंड भारताच्या इतिहासात आपल्या न्यायप्रिय, लोकाभिमुख व राष्ट्रसेवेला वाहिलेल्या कार्यामुळे अजरामर ठरलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्ष, अमळनेरच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांना नागरिक आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता अमळनेर बसस्थानकाजवळील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिवादन करताना राजमातांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या जीवनकार्याचे स्मरण करून त्यांच्या आदर्शांपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले.

यानंतर सामाजिक बांधिलकी जपत, एक रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात भाजप कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या उपक्रमाच्या माध्यमातून राजमातांच्या जनसेवेच्या आदर्शाला कृतीरूप देण्यात आले. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या भावनेतून अनेकांनी पुढाकार घेतला आणि समाजासाठी आपले योगदान दिले.

दुपारी कपिलेश्वर मंदिरात विशेष महाआरतीचे आयोजन करण्यात आले. हे मंदिर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी स्वतःच्या प्रयत्नातून जीर्णोद्धार करून बांधलेले असल्यामुळे या स्थळाला विशेष ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आहे. महाआरतीदरम्यान मंत्रोच्चार, भक्तिगीते आणि भक्तिभावाने भरलेला माहोल अनुभवायला मिळाला. परिसर अध्यात्मिक वातावरणाने भारलेला होता.

या उपक्रमांमधून केवळ राजमातांच्या स्मृती जागविणे नव्हे, तर त्यांच्या आदर्शांचा नव्या पिढीपर्यंत प्रसार करणे, हे भारतीय जनता पक्ष, अमळनेरचे प्रमुख उद्दिष्ट होते. न्यायप्रिय, धर्मनिष्ठ, व लोककल्याणकारी राज्यकर्ती म्हणून राजमातांचं व्यक्तिमत्त्व आजही सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे हीच खरी त्यांना आदरांजली असल्याचे आयोजकांनी नमूद केले.

या कार्यक्रमात भाजपा प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष भैरवी वाघ पलांडे, खानदेश शिक्षण मंडळाचे माजी चेअरमन डॉ. अनिल शिंदे, ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकर्त्या भारती सोनवणे, जानवे मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, पातोंडा मंडल अध्यक्ष राहुल पाटील, शहराध्यक्ष योगेश महाजन, माजी जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील, माजी नगरसेवक श्याम पाटील, पांडुरंग महाजन, विक्रांत पाटील, माजी शहराध्यक्ष हरचंद लांडगे, खा. शी. संचालक माधुरी पाटील, अर्बन संचालिका वसुंधरा लांडगे, स्वपना पाटील, स्नेहा ऐकतारे, निळकंठ तात्या, सरचिटणीस राकेश पाटील, राहुल पाटील, रणजित पाटील, डी. ए. धनगर सर, मगन भाऊसाहेब, दिनेश माळी, विजय बाविस्कर, युवा मोर्चा देवा लांडगे, राहुल चौधरी, समाधान पाटील, कल्पेश पाटील, रितेश सोनवणे, हिरालाल पाटील, संजय पाटील, घनश्याम पाटील, प्रवीण पाटील, निखिल धनगर, अक्षय चव्हाण, दर्पण वाघ, अनिरुद्ध शिसोदे, अक्षय पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें