अविनाश निकम यांनी विधी परीक्षेत मिळविले घवघवीत यश

जामनेर:( प्रतिनिधी): शेंदुर्णी येथील अविनाश निकम यांनी सन २०२४ च्या विधी पदवी अर्थात एलएलबी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील रहिवासी व्यवसायाने शिक्षक असलेले अविनाश निकम यांनी नुकतेच एल एल बी परीक्षेत घवघवित यश संपादन केले आहे.अविनाश निकम यांनी यापूर्वी बी एससी, डीएमएलटी, डी.फार्मसी,बी.ए.,बी एड,इतिहास व हिंदी विषयात एमए अश्या एकूण सहा विषयात पदवी हस्तगत केल्या आहेत.आपला घर प्रपंच सांभाळून सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटविल्याने नुकतेच त्यांना संजीवनी फाऊंडेशन,महाराष्ट्र राज्यच्या वतीने संगमनेर येथे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.ते सध्या छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यावर पी.एचडी करीत आहे.त्यांच्या या यशा बद्दल सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.ते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई च्या जळगांव जिल्हा कार्याध्यक्ष प्रा विजय गाढे यांचे शालक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]