योजना आहे मानव विकास! सायकली मिळाल्या झकास!!

मानव विकास योजनेअंतर्गत शिरूड हायस्कूलमध्ये ६१ विद्यार्थिनींना केल्या सायकली वाटप

अमळनेर: ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून मानव विकास योजनेअंतर्गत तालुक्यातील शिरूड येथील व्ही. झेड. पाटील हायस्कूलमध्ये ६१ मुलींना संस्थेचे ऑ. सेक्रेटरी प्रा. भरत जीवन पाटील, श्रीमती पुष्पलता अशोक पाटील (अध्यक्ष स्कूल कमिटी) , श्याम बापू अहिरे (सभापती पं. स. ), काळू नाना पाटील ( मा.प्रेसिडेंट शेतकी संघ) व सर्व सन्माननीय शालेय समिती सदस्य यांच्या हस्ते सायकली वाटप करण्यात आल्या. मुलींना शाळेत येण्या जाण्यासाठी शासनाकडून मोफत सायकली देण्यात आल्या. शाळेत छोट्या समारंभात सायकल वाटप करण्यात आल्या. तसेच विद्यालयाचा माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2024 निकाल नुकताच घोषित झाला. शाळेचा निकाल 97.36 % एवढा लागला. प्रथम- मृणाल शिंपी 88.80% , द्वितीय -रेणुका पाटील 85.80% ,तृतीय -नयन पाटील 81.40% अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून संस्थेच्या वतीने अध्यक्ष उदय नारायण पाटील सेक्रेटरी प्रा.भरत पाटील व स्थानिक स्कूल कमिटी यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा.भरत पाटील व श्री अनंतराव मोरे (से.नि.तहसीलदार) यांच्याकडून वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली.
यावेळी श्री. जयवंतराव पाटील (मा.संचालक), श्री. गोविंदभाऊ सोनवणे (सरपंच), सौ. मिराबाई पाटील (चेअरमन वि.का.सो.),श्री. वसंतराव पाटील , श्री. पंजू बापू पाटील ,श्री. डी. ए. धनगर सर, श्री विजय बोरसे, सौ. योजना पाटील मॅडम , श्री रामलाल पाटील, श्री.दिलीप पाटील सर्व शालेय समिती सदस्य तसेच मुख्याध्यापिका श्रीमती.सविता बोरसे,श्री.बापूराव महाजन (मा.सरपंच), सौ कल्याणी पाटील (उपसरपंच), श्री.किरण पाटील सर, श्री.राजेंद्र शिंदे सर ,श्री.नंदकुमार अहिरे,श्री. अतुल सोनवणे, श्री.राजेंद्र पाटील, पालक वर्ग व सार्वजनिक युवक मंडळ हजर होते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन- श्रीमती योगिता देशमुख मॅडम व आभार प्रदर्शन- श्री गुलाब बोरसे सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]