लोकशाही चा सर्वात मोठा उत्सव या थिमवर सरस्वती विद्या मंदिर शाळेत उभारले आदर्श मतदान केंद्र

सेल्फी पॉइंट वर मतदार सेल्फी काढण्यासाठी उत्साही…

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त जेष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांनीही सपत्नीक मतदान करून सरस्वती विद्या मंदिर येथे सेल्फी पॉईंटवर उत्साहाने फोटो काढले.

अमळनेर : येथील शंकर नगर येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत ‘ लोकशाही चा सर्वात मोठा उत्सव ‘ या थिमवर आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले होते. तर सेल्फी पॉइंट वर् मोठ्या संख्येने मतदार सेल्फी काढण्यासाठी उत्साही दिसत होते.
लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सवात आपले हार्दिक स्वागत करीत असल्याच्या प्रवेशद्वारावरील स्वागत कमानीतून लाल कार्पेटवरून मतदारांचा होणारा स्वागत मंडपातील प्रवेश उत्साह वाढवणारा होता. तर सदर स्वागत मंडपात मतदान विषयक जागृतीचे लावलेले पोस्टरही लक्षवेधी ठरत होते. सरस्वती विद्या मंदिर च्या झाडांनी भरलेल्या शाळा परिसरात सर्वत्र तिरंगी फुग्यांच्या माळा पताक्यासारख्या मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेल्या होत्या तर मतदान केंद्रातील बूथ मध्येही तिरंगी फुग्यांनी करण्यात आलेली सजावट, मतदान केंद्र परिसरात काढण्यात आलेली माझे मत माझी ताकद, चला मतदानाला जाऊया हा संदेश देणारी भव्य रांगोळी, मतदान केंद्रातील वर्गांमध्ये अंथरण्यात आलेली लाल मॅट मतदारांचा उत्साह वाढवणारे होते. अपंग मतदारांसाठी रॅम्प व स्वतंत्र अपंग सायकलीचा वापर करण्यात येत होता. तर सर्वांसाठी थंड पाण्याचे बॅरल ची सोय तसेच श्री व पुरुषांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय मतदान केंद्राच्या आवारात उपलब्ध होती.
याठिकाणी मतदान केल्यानंतर मतदार उत्साहाने सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढण्यासाठी गर्दी करीत होते. संपूर्ण परिसर दिवसभर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात आला होता.
शंकर नगर येथिल सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या या आदर्श मतदान केंद्र सरस्वती विद्या मंदिरचे मुख्याध्यापक रणजित शिंदे व कर्मचारी वृंद यांनी युनियन बँक ऑफ इंडिया अमळनेर शाखा व्यवस्थापक व कर्मचारी वृंद, श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष अशोक पाटील यांच्या सहकार्याने तसेच अमळनेर तहसिल कार्यालय, अमळनेर नगर परिषद यांच्या मार्गदर्शनाने उभारण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]