उत्तुंग भरारी! राहुल किशोर बडगुजर इंग्लंडला (U. K.)रवाना.

U. K. मधील नामांकित कंपनी (JAGUAR/JLR)मध्ये निवड

अमळनेर: तालुक्यातील ल मुळगाव प्रगणे डांगरी हल्ली राहणार अंमळनेर येथील सौ. कल्पना व श्री. किशोर बन्सीलाल बडगुजर यांचा मोठा मुलगा श्री. राहुल बडगुजर ह्यांची U. K. मधील नामांकित कंपनी (JAGUAR/JLR)मध्ये निवड झाल्याने तो नोकरीसाठी रवाना झाला. लहानपणापासून अत्यंत हुशार, बोलका व होतकरू असलेला राहुल याने प्राथमिक शिक्षण सानेगुरुजी शाळेत घेतले. माध्यमिक शिक्षण जी. एस. हायस्कूल येथे घेऊन त्याने पुणे येथील AISSMS कॉलेज मधून B. E. चे शिक्षण घेतले. यापूर्वी त्याने SANDVIK,LEAR, LEGRAND,VASHI ELECTRICALS व M. G. MOTERS आदी कंपनीचा अनुभव घेतला. वडील नवीन मराठी शाळा अमळनेर व आई जि. प. शाळा अमळगाव येथील प्रा. शिक्षक यांचा तो मुलगा आहे. त्याच्या या यशाबद्दल . बडगुजर समाज पंच मंडळ अमळनेर तसेच चामुंडा माता मंदिर निर्माण समिती अमळनेर व सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]