अमळनेर महिला मंचतर्फे झाले स्किन,हेअर व बॉडी केअर मार्गदर्शन शिबिर

अमळनेर:  महिला मंचतर्फे झाले नुकतेच महिलांना स्किन,हेअर व बॉडी केअरसाठी दोन दिवसीय मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले.
सदर शिबिरात ब्युटीशीयन व डायटेशीयन समिक्षा जैन यांनी महिलांची तपासणी करून अनमोल मार्गदर्शन केले.शिबिरास महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला.शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंचच्या अध्यक्ष डॉ अपर्णा मुठे,डॉ मंजूश्री जैन,कांचन शाह व प्रा शीला पाटील यांचे सहकार्य लाभले.
दरम्यान अमळनेर महिला मंच महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासह त्यांची शारीरिक व मानसीक काळजी देखील घेत असून सौंदर्याचे देखील उपक्रम रावबीत असल्याने महिलांसाठी हा मंच उत्तम व्यासपीठ ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]