महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना
अमळनेर: राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च पासून मानधन रखडले होते.लोकसभा निवडणुक आणि लग्नसराईची धामधूम असताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती.
मार्च २०२४ पासूनचे रखडलेले मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तत्काळ अदा करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी गेल्या आठवड्यात शासनाकडे केली होती.
सदर मागणीचीदखल घेत दोन दिवसांपासून मानधन मिळण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आथिर्क दिलासा मिळाला आहे.संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी कळविले आहे.