हिंदू नववर्ष रॅलीचे अमळनेरात जोरदार स्वागत..!

अमळनेर: येथील नागरिकांनी  दि.९ रोजी स्वयंस्फूर्तीने हिंदू नववर्ष शोभा यात्रा काढली.हिंदू नववर्ष शोभा यात्रेचे विसावे वर्ष असल्याने नागरिकांमध्ये उत्साह दिसला. प्रताप मिल कंपाउंड मधील बन्सीलाल पॅलेस इथे हिंदू नववर्ष रॅलीसाठी सर्व एकत्र आले होते.सुरुवातीला देशभक्तीपर गीत व आरती होऊन शोभायात्रेला सुरुवात झाली. त्यावेळी शहरातील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी आपली झाकी सजवून आणलेली होती. त्यात झाकिंमध्ये पैलाड येथील नागरिकांनी अहिल्याबाई होळकर, प्रजापिता ब्रह्मकुमारी,श्रीराम मंदिर प्रतिकृती, चौधरी समाज रथ, नगरपालिका रथ, जळगाव जनता बँक, स्वामीनारायण मंदिर, अमळनेर गोशाळा, अग्रवाल समाज रथ, आसाराम बापू रथ,नवलभाऊ पाटील, सैनिकी शाळा रथ, संत गोरा कुंभार आरस, सुतार समाज आरस, आर्ट ऑफ लिव्हिंग रथ, जळगाव पीपल बँक, अर्बन बँक,हस्ती बँक, संत तुकाराम महाराज झाकी, संत गाडगे बाबा झाकी, जी.एस. हायस्कूल, डी.आर.कन्या शाळा,पी.बी. ए. इंग्लिश मीडियम,सावित्रीबाई फुले शाळा, जय झुलेलाल, मंगळ ग्रह सेवा संस्था यांच्या वेगवेगळ्या झाकी दिसल्या. बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा व राम मंदिर झाकीने सर्वांचे लक्ष वेधले. तरुण-तरुणी, सामाजिक कार्यकर्ते,नगरसेवक,प्रतिष्ठित नागरिक,महिला नऊवारी साडी परिधान करून आलेल्या होत्या. महिला व मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.घोडे, वेगवेगळ्या झाकी, देशभक्ती पर गीत यांनी सर्वांचे लक्ष वेधले. शोभायात्रेचे सर्वांनी रांगोळी काढून स्वागत केले. ठिकठिकाणी रॅलीवर फुलांच्या वर्षाव करण्यात आला.नागरिकांनी ठीक ठिकाणी पाणी व शरबतची व्यवस्था केली होती. शोभायात्रेत सर्वांना फेटे बांधलेले दिसले.बजरंग शेठ अग्रवाल,ओमप्रकाश मुंदडा, प्रदीप अग्रवाल, नीरज अग्रवाल,योगेश मुंदडा, भैरवी वाघ पलांडे,उमेश वाल्हे, राजाभाऊ खाडिलकर, विकास जोशी, सुरेश पवार,दिनेश पालवे, प्रकाश ताडे,विजय पाटील, नाना धनगर, मनोहर महाजन, पवन बारी,डॉ. संजय शहा,प्रा.डी.डी.पाटील, प्रा.एस. आर. चौधरी, आत्माराम चौधरी, बी.एन. पाटील,मनोज भोई, प्रमोद पवार, विजय चव्हाण, पंडित नाईक, देवेंद्र परदेशी, नरेंद्र निकम, पंडित नाना चौधरी, हेमंत सैंदाणे,लालू सैनानी, सुभाष गुरव,दिलीप पाटील, बापू हिंदुजा ,अनिल शिंपी, प्रवीण पाटील, संजय चौधरी, हैबतराव पाटील, प्रा. जे.सी. अग्रवाल,विनोद अग्रवाल, जितू सोनार,प्रभाकर कोळी, संजय कुंभार, त्रिगुण आराध्य उपस्थित होते. शेवटी बजरंगशेठ यांनी सर्वांचे आभार मानले. पसायदान म्हणून शोभा यात्रेचा समारोप झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]