अमळनेर बाजार समिती संचालकांवर टांगती तलवार

सचिव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण,पुणे यांचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था ,जळगाव यांना तीन दिवसात कारवाई चे आदेश

अमळनेर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुमारे एक वर्षांपूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत प्रचंड पैशांचा वापर झाल्याचे वृत्त तत्कालीन कालखंडात चर्चेचा विषय झाला होता . सुमारे ४० ते ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम व पैठणी साडी वि. का. सो. मतदारसंघातील प्रतेक मतदारांना मिळाल्याच्या खमंग चर्चा रंगत होत्या . संचालकांच्या निवडणूकीसह चेअरमन पदाची निवड संपन्न झाल्यानंतर गावरानी जागल्या सेना या संघटनेच्या स्तरावरून निवडणूक खर्चाच्या तपशिलाची माहिती प्राप्त करून घेतल्याअंती संचालकांच्या स्तरावरून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणातील आदेशातील नमूद तरतुदींचे उल्लंघन झाल्याची बाब निदर्शनास आली . संचालकांच्या स्तरावरून करण्यात आलेल्या राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशातील उल्लंघनाच्या बाबीस अनुसरून गावरानी जागल्या सेना या संघटनेचे अध्यक्ष सत्यशोधक विश्वासराव पाटील यांच्या स्तरावरून जिल्हा उपनिबंधक , जिल्हाधिकारी तसेच राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण या कार्यालयांशी पत्रव्यवहार करण्यात आला . गावरानी जागल्या सेना या संघटनेने केलेल्या पत्रव्यवहारास उत्तरा दाखल प्राप्त झालेल्या पत्रांन्वये मा. जिल्हा उपनिबंधक , सहकारी संस्था , जळगाव यांना अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची निवड अवैध घोषित करून त्यांचे संचालक पद रद्द करण्यात यावे अशा केलेल्या मागणीबाबत तात्काळ सखोल चौकशी करून अहवाल सादर करणेची बाब सचिव , राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण , पुणे व जिल्हाधिकारी , जळगाव यांच्या स्तरावरून सूचित करण्यात आल्याचे वृत्त हाती आले आहे . परिणामी जिल्हा उपनिबंधक , सहकारी संस्था , जळगाव यांच्या स्तरावरून सखोल चौकशीअंती नेमका काय निर्णय घेतला जाणार ? असा प्रश्न उपस्थित झालेला असून अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदावर आजरोजी टांगती तलवार तरंगत असल्याचे दिसून येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]