कॉपीमुक्त अभियानाचा घेतला आढावा
अमळनेर: येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल च्या इयत्ता दहावी केंद्राला प्रांताधिकारी महादेव खेडकर,डीवायएसपी सुनील नंदवाळकर,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा,वरीष्ठ पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या संयुक्त पथकाने गणित विषयाच्या पेपर ला अचानक भेट दिली.यावेळी त्यांनी परिक्षाकेंद्रात जाऊन विद्यार्थ्यांची पाहणी केली.
जिल्ह्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाने कॉपीमुक्त अभियानाला सकारात्मक प्रतिसाद मिळात आहे.याच अभियानांतर्गत महसूल व पोलीस पथकाने जी.एस.हायस्कूल ला भेट दिली असता विद्यार्थी शांततेने पेपर सोडवितांना आढळून आले.परीक्षा केंद्रावरील शांतता पाहून अधिकाऱ्यांनी देखील शालेय पदाधिकारी यांचे कौतुक केले.पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.
यावेळी मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख बी.एस.पाटील,उपमुख्याध्यापक सी.एस.पाटील,पर्यवेक्षक ए.डी.भदाणे,एस.आर.शिंगाने,दक्षता समितीचे के.पी.पाटील,आर.जे.पाटील,ए.के.छाजेड तसेच बैठे पथकातील सदस्य उपस्थित होते.