चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीने लॉकअपमध्ये गळफास घेऊन केली आत्महत्या

मारवड पोलिस ठाणे अतंर्गत दाखल चोरी प्रकरणात आरोपीला न्यायालयाने दिली होती दोन दिवसाची पोलीस कोठडी

अमळनेर : चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी घनश्याम भाऊलाल कुमावत ( ३५, रा. डांगरी ता. अमळनेर) याने अमळनेर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी घड़ली, डांगरी येथे बकरी चोरी प्रकरणात घनश्याम यास याआधीच अटक झाली होती. यानंतर त्याला डांगरी-करणखेडे शिवारात तार चोरी  प्रकरणात अटक करण्यात आली.

दिनांक २५/०२/२०२४ रोजी पहाटे ०२.०० वाजेच्या सुमारास रमेश बंडू वडार हे घरात.झोपलेले असताना यांच्या घराच्या ओट्यावरून ४०००/- रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची बकरी घनश्याम भावलाल कुमावत रा डागरी याने चोरून नेली म्हणून त्याच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद मारवड पोस्टे CCTNS नं २१/२०२४ IPC ३७९ प्रमाणे दाखल करण्यात आली होती.आहे. सदर गुन्ह्यात संशयित आरोपी घनश्याम कुमावत याला ताब्यात घेण्यात आले असता अमळनेर मेहरबानी न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.आज दिनांक ९ मार्च रोजी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान पोलीस कास्टडीत अंगावर पांघरण्याच्या गोधडीने आत्महत्या केल्याची घटना घडल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले. सदर घटनेची माहिती जळगांव पोलिस अधीक्षक रेड्डी,नाशिक सीआयडी पोलिस अधीक्षक,अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर/पवार,स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील,उपविभागीय पोलिस अधिकारी नंदवांळकर आदींनी अमळनेर पोलिस ठाण्यात धाव घेतली व परिस्थिती वर नियंत्रण मिळविले.दरम्यान संशयित आरोपी घनश्याम कुमावत याचे नातेवाईक यांनी याला जबाबदार कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल अन्यथा शव विच्छेदन करू नये म्हणून मागणी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र उपस्थित पोलिस अधिकारी व पत्रकार यांनी त्यांची समजूत काढल्याने शव विच्छेदन करण्यास सहकार्य केले.


अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर/पवार यांनी अटकाव न्युजशी  बोलतांना सांगितले की,झालेल्या प्रकारची सखोल चौकशी केली जाईल व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.सदर आरोपीवर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याने याबाबत ची माहिती गोळा करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]