अमळनेर तालुका महाविकास आघाडी तर्फे भव्य शेतकरी मोर्चा
सध्या अमळनेर तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असून शेतमालाचे पडलेले भाव दिवसेंदिवस महाग होत चाललेली खते व बी – बियाणे त्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकरी हैराण झाल्याचे विदारक चित्र तालुकाभरात आहे तरी देखील सरकारला जाग येत नसल्यामुळे सरकारला भानावर आणण्यासाठी अंमळनेर तालुका महाविकास आघाडी तर्फे भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात येत असून मोर्च्यात खालील मागण्या करण्यात येत आहेत
मोर्चातील प्रमुख मागण्या –
- सतत ४२ दिवस पाऊसाचा खंड पडूनही अमळनेर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला नसून अमळनेर तालुक्यास दुष्काळी जाहीर करून २०२३ च्या खरीप हंगामासाठी दुष्काळी अनुदान मिळावे
- फेब्रुवारी २०२४ मध्ये गारपीट , अवकाळी पाऊस व वादळ यामुळे झालेल्या नुकसानीचे हेक्टरी ५० हजार अनुदान तात्काळ देण्यात यावे
- २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टी , अवकाळी पाऊस व गुलाबी वादळाचे अनुदान त्वरित वितरित करण्यात यावे
- सर्व प्रकारच्या शेतमालास एम.एस.पी. जाहीर करण्यात यावा
- महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेचे ५० हजार प्रोत्साहन पर अनुदान पात्र शेतकऱ्यांना देण्यात यावे
- पी एम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची निवड लवकरात लवकर करण्यात यावी
- २०१९ च्या अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करून विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी
- खत – बियाणे व शेतीचे अवजारे यांच्या किमती ५०% ने कमी करण्यात याव्यात
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतमजुरांचा समावेश करण्यात यावा
सोमवार ११ मार्च २०२४
सकाळी १० : ०० वाजता
ठिकाण –
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह ते तहसील कार्यालय , अमळनेर
आयोजक –
महाविकास आघाडी , अमळनेर