अमळनेरला “भिजकी वही ” अभिवाचनाचे अफलातून सादरीकरण!!

परिवर्तन संस्था जळगाव ने केला सादर…

पूज्य सानेगुरूजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात डिजीटल स्क्रीन उद्धघाटन सोहळा संपन्न

अमळनेर प्रतिनिधी: पूज्य साने गुरुजी वाचनालय व मोफत वाचनालय आयोजित “भिजकी वही ” हा अभिवाचनाचा प्रयोग अमळनेर नगरीत महिला दिनाच्या पूर्व संध्येला पार पडला. “भिजकी वही “हा सुंदर अभिवाचनाचा अप्रतिम प्रयोग परिवर्तन संस्था जळगाव यांच्या टिमने सादर केला. “भिजकी वही ” हा ख्यातनाम कवी, लेखक, कलाकुसरात सराईत जे.जे. आर्ट चे कुचलाकार अरुण कोल्हटकर यांनी लिहिलेल्या “भिजकी वही”ह्या कवितासंग्रह यावर शंभू पाटील जळगाव तथा खान्देश ची शान शंभू अण्णा यांच्या सुमधुर, कानाला तृप्त करणाऱ्या भाषा शैलीत अभिवाचनाचा कार्यक्रम सादर झाला. शब्दाला सोन्याचा मुलामा देणारा हा अवलिया महाराष्ट्रात साहित्य कलाकृती जनमानसात ताकदिने पोहचवितो. बहिणाबाई, अमृता इमरोज, अरुण कोल्हटकर, रानकवी ना. धो. महानोर असोत की साहित्यात नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या कोसलाकार भालचंद्र नेमाडे असोत त्यांना रसिकाच्या हृदयात पोहोचविण्याचे काम शंभू अण्णा करित आहे. साने गुरूजी वाचनालयात झालेल्या कार्यक्रमात अरुण कोल्हटकर हया कवीला समाजमनात पोहोचविण्याचे अप्रतिम काम अण्णा करित आहे. शब्दाला जादुमयरित्या फिरवण्याची अदब शंभू अण्णा कडे आहे. विविध कवितेचा केवळ भावार्थ नाही तर लक्षार्थ मनामनात पोहचवितो. चिंब करून टाकतो त्या शब्दाच्या तुषाराने अन अनुभवास देतो साहित्याची प्रभा रसिकाच्या नसनसात कायमचीच.. ह्या “भिजकी वही “प्रयोगाने साऱ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. भिजकी वही ह्या कवितेच्या दालनाने महिला जीवनाची व्यथा सुंदर रित्या सादर केली आहे. अरुण कोल्हटकर अवलियाने महिलाच्या जीवनाचे अतिसूक्ष्म वर्णन यात आहे. लैला व मजनु यात मजनुच्या पुरुषप्रधान चरित्राला वाढविले परंतू निरपेक्ष प्रेम करणारा कैस महमद दिसला नाही. महिलेला बदनाम करणारी पुरुषप्रधान संस्कृती स्त्रीला कसे बदनाम करते यावर अरुण कोल्हटकरांनी सुंदर भाष्य केले. अद्वैत व बहुदैवत्व ह्या संकल्पना त्यांनी दाखविल्या. प्रेम सांगणारा धर्म स्वतःच्या धर्मासाठी रक्ताची रांगोळी करतो. धर्माला मानवतेचा अर्थ समजला नाही. परंतू सामान्य महिला लोकांना एक सुंदर आदर्श ठरतात. महिलावर आज सुध्दा बलात्कार होतात. फार लाजिरवाणी गोष्ट आहे. मेरी येशूच्या प्रेमासाठी आतूर पण येशू तिला प्रेम देऊ शकला नाही. अशा सुंदर काव्याला रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे धाडस परिवर्तन टिम ने केले आहे. अमळनेरला पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयातील जुन्या टाऊन हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महिला व श्रोते वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते…

‘बिजगी वही’ हया प्रयोगाचे यांनी केले सादरीकरण

शंभू पाटील,सुदीप्ता सरकार,मंजुषा भिडे,अपूर्वा पाटील अंजली पाटील,सोनाली पाटील
हर्षल पाटील,मोना निंबाळकर,
नेहा पवार प्रकाश योजना – राहुल निंबाळकर नेपथ्य प्रवीण पाटील
वेशभूषा पल्लवी सोनवणे यांनी कार्यक्रम सादरीकरण केला.

पूज्य सानेगुरूजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात डिजीटल स्क्रीन उद्धघाटन सोहळा संपन्न
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात मंगळ ग्रह संस्थांचे अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांनी साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयातील स्पर्धा परीक्षा केंद्राला डिजिटल स्क्रीन मोफत दिल्याबद्दल त्याचे उद्घाटन रंगकर्मी शंभू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप सोनवणे होते, प्रमुख अतिथी ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ होते..
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डिगंबर महाले म्हणाले की पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालय येथील स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून अनेक तळागाळातील मुलं वेगवेगळ्या पदावर लागल्यामुळे वाचनालयाचा हा उपक्रम प्रेरणादायी आहे. स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक विजयसिंह पवार हे अत्यंत पोट तिळकिने मेहनत घेत आहेत…
यासाठी माझ्याकडून नेहमीच सहकार्य राहील व वाचनालयाचे संचालक मंडळ कार्यक्षम आहे व ते विविध उपक्रम राबवत असतात व कोणत्याही संस्थेत संचालक मंडळ चांगले राहिले तर संस्था भरभराटीला जाते ते या संचालक मंडळांनी दाखवून दिले आहे असे मंगळ ग्रह संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले…
यावेळी मंगळ ग्रह संस्थांनचे अध्यक्ष डिगंबर महाले सर व संचालक मंडळ यांच्या दातृत्वाबद्दल साने गुरुजी वाचनालयाच्या वतीने कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व ज्येष्ठ रंगकर्मी शंभू अण्णा पाटील व मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..
कार्यक्रमाची प्रस्ताविक दिलीप सोनवणे यांनी केले तर सूत्रसंचालन स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक विजयसिंह पवार यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, चिटणीस प्रकाश वाघ, संयुक्तचिटणीस सुमित धाडकर, संचालक निलेश पाटील,अँड रामकृष्ण उपासनी,ईश्वर महाजन ,भिमराव जाधव,दिपक वाल्हे,प्रसाद जोशी व वाचनालयाचे कर्मचारी व स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक विजयसिंह पवार
यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]