महाशिवरात्रीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात झाली लघुरुद्र महापूजा

अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरातील श्री मंगळेश्वर महादेव मंदिरात परंपरेप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त श्री लघुरुद्र महापूजा झाली. शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख चंद्रशेखर हिरालाल भावसार हे सपत्नीक महापूजेचे यजमान होते.

गणपती पूजन, पुण्याहवाचन होऊन श्री मंगळेश्वर महादेवाची विधिवत मंत्रोच्चारात पूजा होऊन लघुरुद्राभिषेक झाली.पुरोहितांनी भगवान महादेवांची स्तुतीपर भावगीते, भक्तिगीतेही गायली.

केशव पुराणिक मुख्य पुरोहित होते. त्यांना पुरोहित सुनील मांडे, सारंग पाठक, शुभम वैष्णव, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, अक्षय जोशी, मंदार कुलकर्णी, व्यंकटेश कळवे, मयूर राव, मिलिंद उपासनी यांनी सहकार्य केले. यावेळी विशेष महाआरती झाली. मंदिर परिसरात शिवपरिवाराच्या प्रतिमेची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव एस. बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, मंगल सेवेकरी आशा महाले आदींसह मंदिराचे सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]