अमळनेर: रेल्वे स्टेशनचा अमृत भारत योजनेंर्गत आधुनिकीकरणाचे ऑनलाईन उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यावेळी ऑनलाईन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे उपस्थित होते.ऑनलाईन उद्घाटनाच्या अगोदर अमळनेर शहरातील एन.टी. मुंदडा ग्लोबल इंग्लिश मिडीयम, श्रीमती डि.आर. कन्या शाळा, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कुल, एन.टी.मुंदडा हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज ,भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक विद्या मंदिर या शाळांनी संस्कृतीक कार्यक्रम सादर केले. त्यावेळी
खान्देशचे लोकप्रिय खासदार उन्मेशदादा पाटील,विधान परिषदेच्या माजी सदस्या स्मिता पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील, सी.ए.नीरज अग्रवाल,डॉ.अनिल शिंदे, रेल्वे सल्लागार समितीचे चंद्रकांत कंखरे,निर्मळकुमार कोचर, राहुल किशोर पाटील, डॉ.संजय शाह, किर्तीलाल पाटील यांनी शालेय विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप केले. ऍड.व्ही आर पाटील, भिकेष पाटील, सभापती अशोक पाटील, शाम अहिरे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भागवत पाटील, शहर अध्यक्ष मुक्तार खाटीक, भाजपा शहर अध्यक्ष विजय राजपूत, एल.टी. पाटील, शितल देशमुख, शरद सोणवाने,समाधान धनगर, विजय पाटील,कैलास पाटील, राकेश पाटील,भारती सोनवणे, छाया भामरे, ,राहुल पाटील,शिवसेना शहर अध्यक्ष भरत पवार,रावसाहेब पाटील उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीततेसाठी रेल्वे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमांतर सर्वाना फूड पॅकेट वाटप करण्यात आले.
श्रीमती डी.आर.कन्या शाळेच्या करुणा क्लब विद्यार्थिनींनी सादर केलेल्या पर्यावरण नृत्याला मिळाली दाद
ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यात श्रीमती डी.आर.कन्या शाळेच्या करुणा क्लबच्या विद्यार्थीनी
रिया हेमंत बडगुजर, मानसी रमाकांत सेंदाणे,शर्वनी राजेंद्र पाटील, नेहा संजय कुंभार, आस्मा लतिफ पिंजारी, श्रावणी मनेश मोरे ,रूद्राणी स्वप्नील अमृतकार ,आर्या अभिजित भंडारकर,प्रांजल चेतनानंद उपासणी, भाविका सुरेश वाल्हे, घनिका प्रशांत मालसुरे, कावेरी प्रकाश सोनार,गार्गी सुनिल जोशी यांनी केलेल्या पर्यावरण नृत्याला सर्वानी दाद दिली व शाळेच्या मुख्याध्यापिका एस एस सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक एस.बी. निकम, पर्यवेक्षक एस.पी. बाविस्कर, व्ही.एम.पाटील, करुणा क्लब प्रमुख डी.एन. पालवे, रत्नमाला सोनवणे, एस.एस.माळी, जे व्ही बाविस्कर, श्रीमती बी.एस. पाटील, यांचे अभिनंदन केले.
अमळनेर रेल्वे सल्लागार समितीने विशेष परिश्रम घेतले.