मारवड महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव’ दिन साजरा.—

अमळनेर: कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, श्रेष्ठ कवी, नाटककार आणि साहित्यिक वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रताप भिल याने केले,तर प्रास्ताविक प्रा. डॉ. एस. एस. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. एस.एस.पारधी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. व्ही. एस. देसले यांनी मनोगत व्यक्त केले.
भाषा आपल्या मूर्त आणि अमूर्त वारसाचे जतन आणि विकास करण्याचे सर्वात शक्तिशाली साधन आहे. भाषा जी आत्मिय संवादाचं साधन तर आहेच, पण संस्कृतीचे प्रवृत्तीचे प्रतिकही आहे. सभ्य संस्कृतीने प्रदान केलेले अंतःकरणातील भाव भाषेतून व्यक्त होतात. आम्ही भाग्यवान की आम्हांला मातृभाषा मराठी लाभलीय.
कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले, असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे. ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ हा आज २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे थोर मराठी कवी, लेखक, नाटककार, कथाकार आणि समिक्षक , विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात आला. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी कोमल पाटील, पुनम भिल, मुकेश बैसाणे, वैष्णवी भिल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मराठी राजभाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी वाढवून, मराठी साहित्य व संस्कृतीची रुजवण करूया. मराठीच्या विकासासाठी आपण कटिबद्ध राहूया.
सदर कार्यक्रमाचे आभार गणेश मोरे याने मानले. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]