झाडी येथे सरपंच व ग्रामसेवक यांनी वार्डसभेला मारली दांडी

झाडी येथे अनुपस्थित सरपंच व ग्रामसेवक यांच्या खुर्च्यांना पुष्पहार घालून त्यांच्या वार्ड सभा संपन्न

अमळनेर: झाडी येथील ग्रामपंचायत व सरपंच ग्रामसेवक यांचे वार्ड क्रमांक 2 यांच्याशी सापत्न वागणूक देत आहेत.
वार्ड क्रमांक 2 मधील सदस्य निंबा लोटन पाटील व कलाबाई वसंतराव पाटील यांनी त्यांच्या वार्डातील समस्या सरपंच व ग्रामसेवक यांच्यापर्यंत सांगून सोडविण्यासाठी पूर्वसूचना देऊन सरपंच/ग्रामसेवक यांना आमंत्रित केले होते परंतु त्यांनी लोकांच्या समस्यांबद्दल असंवेदनशीलता दाखवत सतत 3 वर्षांपासून पक्षपाती व दुजाभावाची भूमिका घेत वार्डसभेला दांडी मारली. त्यामुळे त्यांच्या खुर्च्यांना हार घालून वार्डसभा संपन्न झाली.आमच्या वार्डमधील तलावाकडील गल्लीला काँक्रिटीकरण रस्ता करण्यात यावा,लोकांना तलावाकडे मुतारी उपलब्ध करून द्यावी,त्या मुताऱ्या व शौचालयांमध्ये प्रचंड अस्वच्छता असून रोगराईला आमंत्रण आहे. दिवाबत्तीची सोय नाही. नियमित पाणीपुरवठा होत नाही अशा अनेक समस्यांचा पाढा वार्ड क्रमांक 2 मधील नागरिकांनी वाचून दाखवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]