श्री.डिगंबर महाले सर यांना केंब्रीज विद्यापीठातर्फे डॉक्टरेट

अमळनेर: येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले सर यांना त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक सेवा व ३२ वर्षांची निष्कलंक पत्रकारितेबद्दल लंडन येथील ख्यातनाम केंब्रीज डिजिटल विद्यापीठाने पीएच. डी. ( डॉक्टरेट ) पदवी देऊन सन्मानीत केले.
हरियाणा राज्यातील सुरजकुंड येथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अनेक महनीय व वंदनीय मान्यवरांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थितीत हा पदवीदान समारोह झाला.
भारत व नेपाळ मधील मोजक्याच मान्यवरांना हा बहुमान मिळाला आहे. श्री. महाले सर यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *