करणखेडे विद्यालयातील आनंदा धनगर सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार केला प्रदान

अमळनेर: श्री आनंदा बापू धनगर (माध्य. विद्या. करणखेडे) यांना आदर्श शिक्षक पुरस्कार् प्रदान करण्यात आला.
मौलाना अबुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय कर्जोद ता.रावेर जिल्हा जळगाव यांच्याकडून आमदार श्री. शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दिनांक 04/02/2024 रोजी कर्जोद ता. रावेर येथे पार पडलेल्या समारंभात मौलाना अबुल कलाम आझाद आदर्श सन्मान सोहळा निमित्त रविवार रोजी श्री आनंदा बापू धनगर सर यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, विविध क्षेत्रात केलेले कार्य भूषणावह व प्रेरणादायी आहे. त्यांनी समाजाची निरपेक्ष सेवा केल्याबद्दल वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेच्या सन्मानार्थ त्यांचे कार्य विधायक व कौतुकास्पद असून सामाजिक बांधिलकीने सेवा करतात. म्हणून श्री ए बी धनगर सर यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवपूर्वक प्रधान करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]