जिल्ह्यातील अनेक ग्रामसेवकांचे धाबे दणाणनार
अमळनेर : जिल्हा परिषद जळगांव अंतर्गत राबवण्यात येणारा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार हा ग्रामपंचायत मध्ये ७०% पेक्षा जास्त कर वसूल करणाऱ्या तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसेवकांना वितरित करण्यात येत असतो. त्याप्रमाणे सन २०१४-१५ या वर्षासाठी जळगांव जिल्ह्यातून एकूण १४ ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यामधून चोपडा तालुक्यातील ग्रुप ग्रा.पं. कोळंबा ता.चोपडा येथील ग्रामसेवक श्री.दिपक मोरेश्वर जोशी यांनी ७०% पर्यंत कर वसुली न करता, कुठलीही उत्कृष्ठ कामगिरी नसतांना, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट नसतांना ते बनावट तयार करून त्या आधारे शासनाची फसवणूक करून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त केला आहे. त्यानुसार त्यांना दरवर्षी एक वेतनवाढ आगाऊ मिळत आहे. परंतु माहितीचा अधिकार कार्यकर्ता योगेश पवार यांनी संबंधित व्यक्तीची माहिती ही माहिती अधिकारा अंतर्गत प्राप्त केली असता, ग्रामसेवक श्री.दिपक मोरेश्वर जोशी यांच्या सादर केलेल्या प्रस्तावामध्ये अनेक बनावट दस्तऐवज आढळून आले होते. त्या बनावट दस्तऐवजाची शहानिशा करणेसाठी योगेश पवार यांनी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे नोव्हेंबर २०२३ मध्ये सदर दाखला पडताळणी करण्यासाठी पाठवण्यात आला होता. त्यानुसार आज दि.०५ फेब्रुवारी २०२४ रोजी पोलीस निरीक्षक, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी सदर दाखला या कार्यालयाकडून निर्गमित झालेला नाही, व देण्यात देखील आलेला नाही. तसेच सन २०१४-१५ चे दप्तर त्यांनी तपासणी केली असता, सदर दाखल्याची कुठेही रेकॉर्ड मध्ये नोंद आढळून आलेली नाही. असा स्वयंस्पष्ट पडताळणी अहवाल योगेश पवार यांना समक्ष सादर देण्यात आला आहे. या प्रमाणे असे किती ? अपात्र ग्रामसेवकांना खोटा पुरस्कार जाहीर करणात आला व देण्यात आलाआहे. म्हणून सदर आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रकरणाची विभागीय आयुक्त स्तरावरून सखोल व सूक्ष्म चौकशी करण्याची मागणी यथावकाश करण्यात येणार असून, याबाबत मात्र जिल्ह्यातील अनेक ग्रामसेवकांचे धाबे दणाणनार असल्याचे दिसून येते.