अमळनेर तालीम संघ व मंत्री अनिल पाटील यांच्या सहकार्याने २८ रोजी खड्डाजिन मध्ये विराट कुस्त्यांची दंगल

File image

अमळनेर : अमळनेर तालीम संघ व मंत्री अनिल पाटील यांच्या सहकार्याने २८ रोजी दुपारी ३ वाजता खड्डाजिन मध्ये विराट कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मुख्य कुस्ती महाराष्ट्र केसरी उपविजेता पैलवान महेंद्र गायकवाड व जम्मू केसरी पैलवान निसार डोडा यांच्यात होणार आहे.
कुस्तीस्पर्धेसाठी पाच लाख रुपये इनाम मंत्री अनिल पाटील यांच्याकडून देण्यात येणार आहे. या स्पर्धांमध्ये एकूण ३४ कुस्त्या होणार आहेत. त्याचप्रमाणे ऐनवेळी देखील बोलीवर कुस्त्या,खडी जोड लावण्यात येणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून बाजार समिती सभापती अशोक पाटील , मंगळ ग्रह संस्थान अध्यक्ष दिगंबर महाले , जिल्हा सचिव सुनील देशमुख , पैलवान भानुदास विसावे , तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी , आदिल पैलवान , संजय महाजन (एरंडोल) उपस्थित राहणार आहेत. स्पर्धांचे आयोजन अमळनेर तालीम संघाचे तालुकाध्यक्ष बाळू पाटील , पैलवान संजय पाटील , माजी नगरसेवक प्रताप शिंपी , हाजी शब्बीर पैलवान , महाराष्ट्र चॅम्पियन रावसाहेब पैलवान ,भरत पवार , प्रवीण पाटील , विजय पाटील , विनोद पैलवान ,सुनील वाघ यांनी केले आहे. राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा होणार असल्याने कुस्तीगिरांसाठी उपयुक्त ठरणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]