अमळनेर: तालुख्यातील बोहरा येथे कृषिदूतांकडून शेतकऱ्यांना विविध विषयांवर प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले जात आहे. कृषी महाविद्यालय अमळनेर येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी येथे दाखल झाले आहेत.
या कृषिदूतांमध्ये गौरव रावसाहेब पाटील, नयन रविंद्र पाटील, निखिल प्रल्हाद पाटील , ललित अनिल पाटील, वैभव शरद पाटील
हयांचा समावेश आहे. त्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव योजना कार्यक्रमांतर्गत सर्वेक्षण केले. सरपंच वैशाली पाटील उपसरपंच चिंधाबाई फुलपागरे, ग्रामसेवक विजय पाटील, शेतकरी दीपक पाटील, ज्ञानेश्वर चैतराम धनगर, ज्ञानेश्वर गरबड धनगर, हंसराज पाटील यांनी कृषिदूतांचे स्वागत केले.
कृषिदूत पीक लागवड पद्धती, आधुनिक शेतीची माहिती, माती व पाणी परीक्षण, कीड आणि रोग यांचे एकात्मिक व्यवस्थापन, शेतीविषयक विविध समस्या याविषयी मार्गदर्शन केले.