रेल्वे प्रवासादरम्यान केली अटक
अमळनेर: IPC 376, 354 आणि POSCO ACT तथा बलात्कारच्या जघन्य गुन्ह्यातील फरार आरोपीला अमळनेर रेल्वे पोलिसांनी शिताफीने अटक करून त्याला सुरत गुजरात पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
दि.18 जानेवारी रोजी सुरत येथे पांडेसरा पोलीस स्टेशन येथे तैनात असलेले पीएसआय दिपेंद्र सिंग यांनी अमळनेर आरपीएफचे एएसआय कुलभूषण सिंग चौहान यांना मोबाईलवरून माहिती दिली की आरोपी मनोजसिंग वडील राजेंद्र, वय 49 रा.श्रीराम नगर, पांडेसरा वडोद, सुरत हा त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन 10 वर्षीय मुलीवर बलात्काराचे जघन्य कृत्य करून फरार झाला आहे, तो रेल्वे प्रवासात असून अमळनेरच्या आसपास असल्याचे कळविले. याची गंभीर दखल एएसआय कुलभूषण सिंह चौहान यांनी घेत आरोपीचा फोटो पॅसेंजर ट्रेन क्रमांक 19007 (सुरत) मधील अमळनेर, धरणगाव, चावलखेडा आणि जळगाव येथील सर्व कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना पाठवला आणि भुसावळ पॅसेंजरची कसून तपासणी करण्यास सांगितले. एएसआय चौहान यांनी स्वत: गुन्ह्याचे गांभीर्य समजून तात्काळ कारवाई करण्यासाठी एक पथक तयार केले ज्यामध्ये कॉ.अर्जुन सिंग आणि कॉ.संतोष कुमार यादव, कॉ.दिनेश मांडळकर होते. ते देखील पॅसेंजर गाडी क्रमांक 19007 अमळनेरहून जळगावकडे आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले. अमळनेरहून जळगावपर्यंत आरोपीचा सखोल शोध घेण्यात आला, बऱ्याच प्रयत्नांनंतर सायबरवरून मिळालेल्या ठिकाणाचे विश्लेषण करताना आरोपीला अटक करण्यात आली. जळगाव स्टेशनवर ट्रेन आल्यावर त्याला टीमसह जनरल डब्यातून पकडण्यात आले. ट्रेनमधून खाली उतरवून सुरक्षित स्थळी नेऊन त्याची चौकशी करण्यात आली.
पोलिसांनी त्याची ओळख पटवून त्याच्याकडे चौकशी केली असता आरोपीने स्वेच्छेने पोलिसांसमोर त्याच्याकडून केलेल्या गुन्ह्याची आणि घृणास्पद कृत्याची कबुली दिली. पोलिसांनी नोंदवल्यानंतर त्याच्याविरुद्ध आयपीसी, 450 आणि पॉस्को कायदा 3(b), 4,5(i), 5(k), 5(m), 6, 8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएसआय कुलभूषण सिंह चौहान यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आरोपीला सुरत शहर (गुजरात) येथील पांडेसरा पोलिस स्टेशनमधून उपस्थित असलेल्या टीमकडे सुपूर्द करण्यात आले. आरोपीस तात्काळ जेरबंद केल्याबद्दल सुरत शहर पोलीस आणि त्यांच्या अधिकार्यांकडून आरपीएफ विभागाचे आभार मानण्यात आले.