प्रताप तत्वज्ञान केंद्रास आंतरराष्ट्रीय धावपटू क्रांती साळवी यांची भेट

अमळनेर दि१७ : येथील जगविख्यात असलेल्या प्रताप तत्वज्ञान केंद्रास आंतरराष्ट्रीय धावपटू दोन वेळा गिनिज रेकॉर्ड धारक क्रांती साळवी(शिंदे) नुकतीच भेट दिली.
क्रांती साळवी(शिंदे) या जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांसाठी अमळनेरात आल्या होत्या. त्यांनी स्वतः या ऐतिहासिक अश्या प्रताप तत्वज्ञान केंद्रास भेटीची इच्छा व्यक्त केली.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या या वास्तुस भेट देऊन तेथील सखोल माहिती जाणून घेतली. सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या असलेल्या ग्रंथालयालाही भेट दिली. त्यातील काही पुस्तके पाहिली व कुतूहल व्यक्त केले.शेतकऱयांना माती आणि पाणी परीक्षणासाठी उपयुक्त असलेल्या प्रयोगशाळा पाहिली यावेळी लॅब टेक्निशीयन.सुवर्णा रायगडे यांनी माहिती दिली. यावेळी क्रांती साळवी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले की, “या प्राचीन ग्रंथालयात अद्वैत तत्वज्ञानावरील दुर्मिळ ग्रंथ पाहून मला सुखद आश्चर्याचा धक्का बसला.ज्ञानाचा अनमोल ठेवा याठिकाणी आहे त्याचा दरवळ जाणकारांना आहेच तथापी याचा लाभ अभ्यासकांनी घ्यावा.”
तदपूर्वी तत्वज्ञान केंद्राचे मानद संचालक प्रा.डॉ.दिलीप भावसार ,कार्यलय प्रमुख रोहिदास साळुंके,ग्रंथालय प्रमुख पंडित नाईक यांनी क्रांती साळवी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी आदित्य भारद्वाज, मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]