माझा प्रभाग पतंग महोत्सव जल्लोषात साजरा…!

अमळनेर : येथील श्रीकृष्णपुरा, वडचौक, सावतावाडी, शारदाकॉलनी श्रीराम कॉलनी, शिवाजीनगर व परिसरातील नागरिक, बाळ गोपाळव महिला मंडळींसाठी सालाबादप्रमाणे खास मकर संक्रांती निमीत्ताने माजी नगरसेवक विक्रांत पाटिल वसमाजसेविका सौ. स्वप्ना पाटील यांनी माझा प्रभाग पतंग महोत्सव आयोजित केला होता त्यात सर्वांना मोफत पतंग देवून सर्वाँनी जोशपुर्ण उत्सवात पतंग उडवून डी. जे. च्या तालावर डान्स, नाचत आनंद घेतला.
सदर पतंग महोत्सवाचे फुगे व पतंग हवेत सोडून माजी आमदार श्रीमती स्मिता वाघ यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी भेट देण्यासाठी खान्देश शिक्षण मंडळाचा उपाध्यक्ष सौ. माधुरी पाटिल, माजी मार्केट प्रशासक सौ. तिलोत्तमा पाटिल, उद्योगपती सौ. लीना पाटिल, सौ. रंजना महाजन, कविता मराठे, शितल सोनार, वैशाली कुलकर्णी, नलिनी बारी, प्रतिभा बारी, राजसबाई भोई, वर्षा पाटील, जयमाला धनगर, प्रतिभा पगारे, सौ. नलिनी ईश्वर पाटिल, विद्या पाटील यांचेसह रणजित पाटील, माजी सरपंच सुरेश पाटिल, कैलास पाटिल,प्रमोद सोनार, अरुण पाटील, शरद पाटील, श्याम साळी, बाळू पाटील, मुकेश ठाकूर, प्रवीण ठाकुर, गणेश सोनवणे, शिवम पवार, गणेश बारी, भुषण महाजन, पंकज वाघ, भैय्या पाटिल, बंटी पाटील, भटू सैंदाणे, जगदीश सोनार, अशोक पाटील, सागर शेटे, दिनेश शेटे, कमलेश बोरसे, राजेश परदेशी, राकेश शेटे, नितेश चव्हाण, हितेश बारी, जयेश बडगुजर, समाधान पाटिल, समाधान नाथबुवा, निरज पाटकरी, यासह मोठ्या संख्येने बाळ गोपाळ, महिला व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपुर्ण मजेशीर सूत्रसंचलन प्रकाश महाजन सर यांनी केले तर कार्यक्रमातील सर्व उपस्थितांचे आभार सौ. स्वप्ना पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]