अमळनेर: येथील मंगलाताई सोनवणे यांची जळगांव महिला जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
जळगांव येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कार्यकारणी ची बैठक महाराष्ट्र राज्य चे अध्यक्षा मा.स्वातीताई शिंदे यांच्या अध्यक्षते पार पडली.त्यांच्या समवेत मा.रागिणीताई पवार,केंद्रिय उप प्रमुख,मा.लताताई तायडे,संघटक, महाराष्ट्र राज्य तथा प्रभारी नाशिक विभाग, मा.के.वाय.सुरवाडे (संघटक, महाराष्ट्र राज्य तथा प्रभारी नाशिक विभाग),जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा पश्चिम महिला विभाग अध्यक्षपदी मंगलाताई सोनवणे(अमळनेर),सरचिटणीस पदी प्रमिलाताई ब्रह्मे आणि कोषाध्यक्ष पदी सविताताई गाडे यांची नियुक्ती करण्यात आली. यानिवडीचे सर्व स्तरातून कार्यकारणीचे अभिनंदन आणि भावी धम्मकार्यास मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.