
अमळनेर : तालुक्यातील सावखेडा येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रविंद्रनाथ कदम यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीबद्दल ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.
लखन कदम यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी ही निवड करण्यात आली. सरपंच निकीता कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड एकमताने बिनविरोध करण्यात आली. ग्रामसेवक मनोज दहीवदकर यांनी याकामी सहकार्य केले. यावेळी सरपंच निकिता कदम, ग्रा.पं. सदस्य लखन कदम, अनिल नेरकर, संजय भिल्ल, लिलाबाई पाटील, हेमलता कदम, प्रतिभा सोनवणे, शोभा अहीरे यांच्यासह ग्रामस्थ अनिल कदम, लक्ष्मीकांत कदम, शाम कदम, दिनेश कदम, सुरेश कदम, निंबा कदम, योगराज कदम, गुलाबराव कदम, भुपेश सोनवणे, दिपक कदम आदी उपस्थीत होते. उपसरपंच पदी निवडीबद्दल रविंद्रनाथ कदम यांना तालुका परिसरातून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या जात आहेत.