अमळनेर तालुक्यातील हिंदी अध्यापक मंडळाचे कार्य कौतुकास्पद

अमळनेर: तालुक्यातील हिंदी अध्यापक मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे.. हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने तालुक्यात हिंदी ग्रंथालय उभारले गेले पाहिजे. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेचा प्रचार प्रसार होईल.. विद्यार्थ्यांना हिंदी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी इतर जिल्ह्यात सहली निमित्ताने घेऊन त्यांच्यामध्ये हिंदी विचारांची देवाणघेवाण करावी असे अमळनेर हिंदी अध्यापक मंडळाच्या बक्षीस वितरण सोहळ्यात साने गुरुजी शिक्षण मंडळाचे सचिव संदीप घोरपडे
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले..
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीपजी घोरपडे,मयूर चंद्रकांत पाटील ( वरिष्ठ व्यवस्थापक,यूनियन बॅक आफ इंडिया शहादा,) प्रा.डाॅ.सौ.कल्पना पाटील ( उप प्राचार्या),.डॉ दिनेश पाटील,खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त
सौ.वसुंधरा लांडगे,जीवनगौरव सन्मानर्थी तथा सेवानिवृत्त हिंदी शिक्षक राजेंद्र पौलाद पाटील ( एकात्मता माध्यमिक विद्यालय, शहापूर ) विजय तुकाराम पवार ( कै.प्र.आबासाहेब एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालय,धार – मालपूर ) केद्रप्रमुख रवींद्र साळुंखे,सावित्रीबाई फुले विदयालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री भदाणे सह उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी केले..
१४ सप्टेंबर हिंदी दिनानिमित्त हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने तालुकास्तरावर सामान्य परीक्षेचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातून पाच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.. ग्रामीण व शहरी भागात उच्च प्राथमिक पाचवी ते सातवी व माध्यमिक गटात आठवी ते दहावी असे दोन गट करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह गोल्ड मेडल सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तालुक्यातील सामान्य ज्ञान परीक्षा यशस्वी करणाऱ्या हिंदी शिक्षकांना कृतिशील अध्यापक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले..तर सेवानिवृत्त हिंदी शिक्षक
राजेंद्र पौलाद पाटील ( एकात्मता माध्यमिक विद्यालय, शहापूर ),
विजय तुकाराम पवार ( कै.प्र.आबासाहेब एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालय,धार – मालपूर ) यांना सहपत्निक मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल देऊन
जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात पत्रकार ईश्वर महाजन,उमेश काटे, मुख्याध्यापक एन.आर.चौधरी,सेवानिवृत्त शिक्षीका वसुंधरा लांडगे यांचा सन्मान करण्यात आला.

गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील म्हणाले की विद्यार्थी दशेतच मुलामुलींवर चांगले संस्कार झाले पाहिजे. शालेय जीवनात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे विद्यार्थ्यांनीही अपयश आले तरी नैराश्य न येऊ देता जोमाने प्रयत्न केले पाहिजे व एक आदर्श नागरिक बनून आपल्या देशाचे, पालकांचे नाव उज्ज्वल केले पाहिजे, असे प्रतिपादन अमळनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी बक्षीस वितरण प्रसंगी मार्गदर्शन करतांना सांगितले
तर प्रा.डॉ कल्पना पाटील, डॉ दिनेश पाटील, सौ वसुंधरा लांडगे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे अभिनंदन करत, हिंदी मंडळाच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले. यशस्वी विद्यार्थी, शिक्षक त्यांच्या भावी वाटचालींना शुभेच्छा दिल्या व हिंदी भाषेचे महत्त्व प्रतिपादन केले.
जीवनगौरव पुरस्कार्थी राजेंद्र पाटील, विजय पवार यांनी हिंदी अध्यापक मंडळाचे धन्यवाद व्यक्त करत हिंदी मंडळाला भविष्यात नेहमीच आमचे सहकार्य राहील असे सांगितले…
हिंदी अध्यापक मंडळाच्या कार्यक्रमाला सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचीव संदीप घोरपडे व शहादा युनियन बँकेचे प्रबंधक मयूर पाटील यांनी आर्थिक सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करण्यात आले…
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हिंदी अध्यापक मंडळाचे माजी अध्यक्ष दिपक पवार व सचीव दिलीप पाटील,श्रीमती मंगला चव्हाण मँडम व आभार डॉ.श्री.किरण निकम यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदी मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे, जिल्हा कार्यकारणी सदस्य एन.आर चौधरी,मार्गदर्शक व माजी अध्यक्ष दिपक पवार, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इन्शुलकर, सचिव दिलीप पाटील ,सहसचिव कमलाकर संदानशिव, कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रसिद्धीप्रमुख ईश्वर महाजन ,सदस्य मुनाफ तडवी ,प्रदीप चौधरी, डॉ किरण निकम,श्रीमती मंगला चव्हाण,श्रीमती कविता मनोरे,श्रीमती योगश्री पाटील, प्रशांत वंजारी, मार्गदर्शक संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, सोपान भवरे यांनी व हिंदी अध्यापक मंडळाचे सर्व सदस्य पदाधिकारी यांनी सहकार्य व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]