नवीन पाणीपुरवठा योजनेचा झाला शुभारंभ
अमळनेर: तालुक्यातील रामेश्वर बु. येथे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने मंजुर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मा.जिल्हा परिषद सदस्यां सौ.जयश्री पाटील यांच्या हस्ते पार पडला.!
जयश्री पाटील यांचे ग्रामस्थांनी जोरदार स्वागत व सत्कार केला, या प्रसंगी अमळनेर बाजार समितीचे संचालक अमळनेर भोजमल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, कामगार नेते एल.टी. पाटील, अमळनेर तालुका रेशन संघटना अध्यक्ष तथा पोलीस पाटील नगाव खु प्रविणपुरी रामपुरी गोसावी, पंडित देविदास पाटील, सुभाष पाटील, भागवत काळू पाटील, सरपंच समाधान दिनकर पाटील, सुनील पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बाळू पाटील, पुंडलिक पाटील, राजू श्रीराम पाटील, युवराज पाटील आत्माराम पाटील, साहेबराव पाटील, अधिकराव पाटील, पुना वंजारी, प्रफुल पाटील, सुभाष पाटील यांच्या सह ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.
या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण यावेळी २५१५ अंतर्गत शेत रस्ता खडीकरण करणे २० लाख, २५१५
अंतर्गत गाव दरवाजा बांधणे १५ लाख या कामांचे भूमिपूजन तसेच आमदार निधी अंतर्गत रामेश्वर बु ते सारबेटे बु पर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे २० लाख, डि.पी.डी.सी अंतर्गत बंधारा बांधणे २० लाख आणि जलजिवन मिशन द्वारा पाणी पुरवठा योजना करणे, ४० लाख या तीन कामांचे लोकार्पण करण्यात आले.