जिजाऊ जयंतीदिनी महिला खुली मॅरेथॉन स्पर्धा

आंतरराष्ट्रीय धावपटू क्रांती साळवी स्पर्धेचे मुख्य आकर्षण

अमळनेर : अटकाव न्यूज: -दि. ०९/०१/२०२४

देशातील क्रमांक एकची पत्रकार संघटना व्हॉईस आॅफ मीडिया, अमळनेर व महाराष्टÑ राज्या मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ यांची जयंती अर्थात शुक्रवार, १२ जानेवारी रोजी सकाळी ९.०० वाजता १५ वर्षांवरील मुली व महिलांसाठी तीन कि.मी. अंतराची खुली मॅरेथॉन स्पर्धेेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर या स्पर्धेचे प्रायोजक आहे.
गीनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड धारक असलेल्या आंतरराष्टÑीय धावपटू क्रांती साळवी (शिंदे) यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण होईल. या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम -५ हजार रुपये, द्वितीय – ३ हजार रुपये तर तृतीय – १ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सदर स्पर्धा नि:शुल्क आहे. स्पर्धकांनी वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड सोबत आणावे. स्पर्धकांनी स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी ८.०० ते ९.०० या वेळेत नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
महाराणा प्रताप चौक ते धुळे रस्त्यावरील कलागुरू मंगल कार्यालय व तेथून परत महाराणा प्रताप चौक असा स्पर्धेचा मार्ग असेल. क्रीडा क्षेत्रातील नवोदित विद्यार्थिनी व महिलांना प्रेरक ठरणाºया या स्पर्धेत मोठ्या संख्येने उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जयंतलाल वानखेडे (८६६८८३०४७२), उमेश धनराळे (८५३०९४९९९९), उमेश काटे (९४२३५७९८२७) आणि बापूराव ठाकरे (९९६०२०९८२५) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]