प्रा. डॉ. जितेंद्र व सौ. स्वाती माळी शिक्षक दाम्पत्यास “राज्यस्तरीय फुले शिक्षक गौरव पुरस्कार” प्रदान

अमळनेर: येथील एस. एन. डि .टी. विद्यापीठ, मुंबई संलग्न रुक्मिणीताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात दि. 6 जानेवारी 2024 रोजी आयोजित एक दिवशीय राष्ट्रीय परिषदेत, मारवड येथील कै. न्हानाभाऊ म. तु. पाटील कला महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा. डॉ. जितेंद्र आनंदा माळी व अमळनेर येथील पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूल मधील शिक्षिका सौ. स्वाती जितेंद्र माळी या दोघं शिक्षक पती-पत्नीला गेल्या 19 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल “चंद्राई बिग बिलियन मल्टीपर्पज फाउंडेशन” व “रायबा बहुउद्देशीय संस्था, धुळे” यांच्या संयुक्त विद्यमाने “क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार” व “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय शिक्षिका गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. या राष्ट्रीय परिषदेत डॉ. माळी यांनी India’s New Education Policy 2020 – an Overview या विषयावर आपला शोध निबंध ही सादर केला.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जे. शेख, चंद्राई फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र सोनवणे, सचिव सौ. ममता सोनवणे, तर रायबा बहुउद्देशीय संस्थेचे सचिव प्रा. प्रमोद पाटील, खजिनदार सौ. प्रिया पाटील, डॉ. उमेश गांगुर्डे, डॉ. एस. पी. ढाके व अन्य मान्यवर उपस्थित होते.

डॉ. माळी व सौ. माळी यांनी मिळविलेल्या पुरस्काराबद्दल दोघांचे महाविद्यालय व शाळेतील प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच अन्य मान्यवर व मित्रपरिवाराने अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]