पत्रकारांची सामाजिक भूमिका उल्लेखनीय -मंत्री अनिल पाटील

पत्रकारदिनी आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन

अमळनेर, दि. ०७ : पत्रकार या नात्याने आपण समाजाला उपयोगी ठरणारे जे कार्य करत आहात, त्यात विविध स्पर्धा तसेच विविधांगी उपक्रमांत नावलौकिक मिळविणाºयांचा सन्मान करुन इतरांना प्रेरीत करण्याचे मोठे सामाजिक कार्य ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने दोन्ही संघटनांचे पत्रकार करीत आहेत, ही बाब उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी पत्रकारदिनी आयोजित कार्यक्रमात केले.
व्हॉईस आॅफ मीडिया, अमळनेर आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे विश्रामगृह, महाराणा प्रताप चौकात आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात ते बोलत होते. याावेळी व्यासपिठावर सेवा निवृत्त तहसीलदार सुदाम महाजन, प्रा. अशोक पवार, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले, पाडळसरे धरण समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, कृ.उ.बा. संचालिका सुषमा देसले, भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, कॉँग्रेस तालुकाध्यक्ष मनोज पाटील, खा. शि. मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, प्रा. सुरेश पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष जयंतलाल वानखेडे, व्हॉईस आफॅ मीडियाचे तालुकाध्यक्ष अजय भामरे आदी उपस्थित होते.
मंत्री अनिल पाटील पुढे म्हणाले की, माझ्या कार्याचे कौतुक लेखणीतून पत्रकार बांधव नेहमी करत असतात, मात्र माझ्या चुकाही आपण आपल्या पत्रकारितेतून लक्षात आणून देत असतात, त्यामुळे आपल्या कार्याची दखल घेण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार तथा नावलौकिक मिळविणाºयांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी दिवंगत पत्रकार राजेंद्र पोतदार व राजेंद्र सुतार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच अटकाव दिनदर्शिका व लेखन मंच दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आले.
मंगळग्रह सेवा संस्थेच्या सहकार्याने व्हॉईस आॅफ मीडिया आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमिवर ५ रोजी खुली मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात जळगावचा जयेश पाटील प्रथम, चोपड्याचा सुनील बारेला द्वितीय तर धडगावचा दिनेश वसावे तृतीय आला होता. या तिघांना मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ बडगुजर आणि सुभाष पाटील घोडगावकर यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच व्हॉईस आॅफ मीडियाच्या उत्तर महाराष्ट्र

विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डिगंबर महाले, जिल्हा संघटकपदी निवड झाल्याबद्दल जयेश काटे, जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल उमेश धनराळे, निबंध स्पर्धेत यश मिळविल्याने ईश्वर महाजन, राष्ट्रीय पॅरा पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत यश मिळाल्याने दिनेश बागडे, त्यांना प्रशिक्षिण देणारे किशोर महाजन यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन उमेश काटे यांनी केले तर आभार डिगंबर महाले यांनी मानले.
यशस्वीतेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव एस. बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव यांच्यासह सेवेकरी तसेच दोन्ही संघटनांचे पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले.

यांनी केला शुभेच्छांचा व
पत्रकारदिनी कार्यक्रमस्थळी मान्यवरांनी भेट देत पत्रकारांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, अभियंता डिगंबर वाघ, हरि भिका वाणी, माजी नगरसेवक प्रताप साळी, प्राचार्य प्रकाश महाजन, माजी केंद्र प्रमुख चिंधू वानखेडे, सभापती अशोक पाटील, हेमंतकुमार भांडारकर, सुनील वाघ, मकसूद बोहरी, राजू चौधरी, शिवसेनेचे विजय पाटील, महेश पाटील, पंडित नाना चौधरी, गोपनिय शाखेचे प्रमुख डॉ. शरद पाटील, सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी संजय चौधरी, प्रा. लिलाधर पाटील, रणजित शिंदे, राष्टÑवादीचे मुक्तार खाटील, इम्रान खाटीक, सोमचद संदानशिव, बाळू पवार, माजी नगरसेवक संजय भिला पाटील, विजय शुक्ल, हैबत पाटील, लोकमतचे उपसंपादक अतुल जोशी, हृदयनाथ मोरे, पंकज मुंदडा, माजी नगरसेवक शाम पाटील, पंकज चौधरी, परिश्रम दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष योगेश महाजन, मुख्याध्यापक मनिष जाधव, योगराज संदानशिव, माजी नगरसेवक प्रताप शिंपी, सोपान भवरे, मनोज शिंगाणे, सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन वानखेडे, सुनिता वानखेडे, अकलाब शेख, इकबाल शेख, मसूद खान, फारुख खान, रियाज खान, रमेश महाजन, डॉ. सुनील पाटील, डॉ. दत्ता ठाकरे, रामचंद्र चौधरी, महेश पाटील , सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी भाऊसाहेब देशमुख,मा. नगरसेवक नरेंद्र संदानाशिव, नावीद शेख आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पत्रकारांवर शुभच्छांचा वर्षाव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]