
बारेला द्वितीय, वसावे तृतीय : पत्रकार दिनानिमित्त खुली मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

अमळनेर : व्हॉईस आॅफ मीडिया व महाराष्ट राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कै. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृतिदिन अर्थात पत्रकार दिनानिमित्ताने घेण्यात आलेल्या खुली मॅरेथॉन स्पर्धेत जळगावचा जयेश पाटील प्रथम, चोपड्याचा सुनील बारेला द्वितीय तर धडगावचा दिनेश वसावे तृतीय ठरले. मंगळग्रह सेवा संस्था या स्पर्धेचे प्रायोजक होते. या स्पर्धेत जळगाव, धुळे, नंदुरबारसह राज्यातील विविध ठिकाणचे स्पर्धक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
नवोदित तरुणांसह प्रौढांनाही पे्रेरक ठरणारा आदर्शवत उपक्रम राबविण्याच्या उद्देशातून कै. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवार, ५ रोजी सकाळी ९ वाजता शहरातील महाराणा प्रताप चौक ते धुळे रस्त्यावरील नूतन प्रवेशद्वार व तेथून परत महाराणा प्रताप चौक या सुमारे पाच कि.मी. अंतराची खुली मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. प्रांताधिकारी महादेव खेडकर व माजी जि. प. सदस्या जयश्री पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रशांत सरोदे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, तालुका पुरवठा अधिकारी संतोष बावणे, ग्राम शिक्षण संस्था मारवडचे चेअरमन जयवंतराव मन्साराम पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, भाजपाचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील, दिनेश नाईक आदींसह मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, तालुका क्रीडा अध्यक्ष सुनील वाघ आदी उपस्थित होते.
स्पर्धेवेळी अमळनेर पोलीस प्रशासन विभागाच्या वाहतूक शाखा, ग्रामीण रुग्णालय, तसेच नगरपरिषदेचे अनमोल सहकार्य लाभले. स्पर्धकांसाठी थंड पाणी व शक्तीवर्धक गोळ्यांची व्यवस्था मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आली होती. स्पर्धेवेळी रस्त्याच्या दुतर्फा बघ्यांची गर्दी होती. विजेत्यांसह सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
व्हॉईस आॅफ मीडियाचे उत्तर महाराष्टÑ विभागीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले, तालुकाध्यक्ष जयंतलाल वानखेडे व्हॉईस आॅफ मीडियाचे तालुकाध्यक्ष अजय भामरे यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. स्पर्धा यशस्वितेसाठी दोन्ही पत्रकार संघटनांचे उमेश धनराळे, प्रा. विजय गाढे, विनोद कदम,समाधान मैराळे, सुरेश कांबळे, जयेश काटे, उमेश काटे, रवींद्र मोरे, विवेक अहिरराव, गुरुनामल बाठेजा, मिलिंद पाटील, उमाकांत ठाकूर, बापूराव ठाकरे, गौतम बिºहाडे, ईश्वर महाजन, सुखदेव ठाकूर, प्रवीण बैसाणे, आत्माराम अहिरे, दिनेश नाईक, राहुल पाटील, मधुसूदन विसावे, कमलेश वानखेडे, हितेंद्र बडगुजर, नूर खान पठाण, संजय सूर्यवंशी आदी पदाधिकारी तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे सेवेकरी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन उमेश काटे यांनी केले तर स्पर्धकांना मिलिंद पाटील यांनी मार्गदर्शन केले.
कै. बाळशास्त्री जांभेकर स्मृतिदिनानिमित्त आज ६ रोजी सकाळी १० वाजता व्हॉईस आॅफ मीडिया, अमळनेर व महाराष्ट राज्य मराठी पत्रकार संघातर्फे विश्राम गृह, महाराणा प्रताप चौक येथे पत्रकार दिन साजरा होणार आहे. यावेळी मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण तसेच तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन दोन्ही संघटनांच्या पदाधिकार्यानी केले आहे.
