देवगांव देवळी हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वत्कृत्व व निबंध स्पर्धा संपन्न

स्त्री आत्मसन्मानाची जनक सावित्रीमाई फुले- शिवानी वाघ

अमळनेर :भारतीय प्रबोधन युगातील पहिल्या स्त्री शिक्षिका प्रौढ शिक्षणाच्या पुरस्कृत्या, दलितांच्या कैवारी, समता चळवळीच्या प्रणेत्या, स्त्री मुक्तीच्या आघ प्रणेत्या, अर्वाचीन मराठी कवितेच्या जनक म्हणजेच कृतीशील समाजसेविका सावित्रीबाई जोतीराव फुले या स्त्री आत्मसन्मानाची जनक होत्या असे बार्टी संस्थेच्या समन्वयक शिवानी वाघ देवगांव देवळी ता.अमळनेर येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये अध्यक्षीय भाषणातून सांगितले…
व्यासपीठावर मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय.आर महाजन, एस.के.महाजन, एच.ओ.माळी,अरविंद सोनटक्के, भाऊसाहेब एन.जी देशमुख होते…
अगोद सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजन करून माल्यार्पन करण्यात आले..
शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने वकृत्व स्पर्धा घेण्यात आली शाळेतील 35 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर निबंध स्पर्धेत 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. 14 सप्टेंबर हिंदी दिनानिमित्ताने शाळेत सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली होती त्या परीक्षेला गुणवंत 10 विद्यार्थ्यांना कै. सागर नगावकर (कुलकर्णी) यांच्या स्मरणार्थ उज्वला नगांवकर व साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालयाचे विश्वस्त बापू नगांवकर यांच्या सौजन्याने स्मृतीचिन्ह देण्यात आली .. बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाचे मान्यवर व अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला..
वकृत्व स्पर्धेतील
प्रथम सोनाली पाटील (इयत्ता नववी)
द्वितीय गायत्री भील (दहावी)
तृतीय क्रिश पाटील (इयत्ता आठवी)
चतुर्थ-रागिणी पाटील (इयत्ता 9 वी)
उत्तेजनार्थ
श्वेता बैसाने, वैष्णवी माळी ,जयश्री पाटील (इयत्ता10)
यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले
शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन म्हणाले की सावित्रीबाई फुले यांचा
असामान्य त्याग, कार्याप्रती असीम निष्ठा, अखंड परिश्रम, अतुलनिय धाडस, आणि अविचल मूल्यांची जपणूक करणाऱ्या सावित्रीबाई स्त्रीजातीस व समस्त मानवजातीसच एक प्रेरणादायी व वंदनीय व्यक्तीमत्व आहे असे सांगितले..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख ईश्वर महाजन यांनी केले तर वकृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून एच.ओ.माळी,अरविंद सोनटक्के यांनी काम पाहिले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एस के महाजन यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी पाटील यांनी प्रयत्न केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]