अमळनेर तालुक्याचे दिवंगत नेते अनिल अंबर पाटील यांच्या संघर्षकन्या
पियुषा पाटील यांच्या वर भारतीय जनता पार्टी च्या महिला मोर्चाची जबादारी.

पियुषा पाटील यांची भाजप महिला मोर्चाच्या पुणे जिल्हा वाकड थेरगाव महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड

महिलांसाठी विविध उपक्रम राबवून पक्ष संघटन मजबूत करनार- पियुषा पाटील.

अमळनेर : अमळनेर तालुक्याचे दिवंगत नेते अनिल अंबर पाटील यांच्या संघर्षकन्या पियुषा अनिल पाटील यांची पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी च्या वाकड-थेरगाव मंडलच्या महिला मोर्चा अध्यक्षा पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड येथील महाराष्ट्रातील सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम फेसबुक च्या माध्यमातून सर्वांच्या घराघरात पोहोचलेल्या पियुषा पाटील यांची भारतीय जनता पार्टी वाकड थेरगाव मंडळच्या महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या ह्या निवडीने त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्ष होत आहे. पियुषा पाटील यांच्या निवडीने पक्ष संघटन मजबूत होणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोशल मीडियाच्या माध्यमातून रियल स्टार पियुषा पाटील हे नाव महाराष्ट्रातील प्रत्येक गावात ओळखीचे झालेले आहे.त्यांचे प्रत्येक व्हिडिओ मोबाईल धारक लाईक केल्याशिवाय राहत नाही.त्यांनी एक्टिंग क्षेत्रात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची एक ओळख निर्माण केली आहे. त्यांना भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाचे अध्यक्षपदी नियुक्ती केल्यामुळे त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. या वेळी मनोगत व्यक्त करतांना त्यांनी सांगितले की महिलांचे अनेक प्रश्न पक्ष संघटनेच्या मार्फत सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. महिलांचे एक मोठं संघटन भारतीय जनता पक्षात उभ करणार असून भारतीय जनता पक्षाचे विचारधारा घराघरातपोहचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे ही चांगल्या पद्धतीने मार्गी लावण्याचे काम करणार असून वाकड थेरगाव सह माझी जन्मभूमी असलेले माझे माहेर अमळनेर या ठिकाणी सुद्धा घराघरात जाऊन भाजपा पक्षाचे संघटन मजबुत करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
नियुक्ती पत्र देताना यावेळी उपस्थिती शहराध्यक्ष शंकर जगताप, प्रसाद कस्पटे अध्यक्ष वाकड थेरगाव मंडळ, संदीप नखाते अध्यक्ष सांगवी रहाटणी मंडळ, सोमनाथ भोडवे, अध्यक्ष भाजपा रावेत काळेवाडी मंडळ तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *