जी.एस.हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी लुटला धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटन स्थळांचा आंनद

४ दिवसीय शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

अमळनेर: येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न झाली.सहलीत विद्यार्थ्यांनी धार्मिक,ऐतिहासिक व पर्यटन स्थळांचा मनमुराद आनंद लुटला.
जी.एस.हायस्कूल ही तालुक्यातील सर्वात मोठी शाळा असून दरवर्षी शाळेचे विद्यार्थी राज्यातील विविध ठिकाणी सहलीच्या माध्यमातून भेटी देत असतात.यावर्षी शाळेची सहल ओझर,लेण्याद्री,शिवनेरी,भीमाशंकर,आळंदी ,देहू,नारायणपूर, जेजुरी,मोरगाव,रांजणगाव व शिर्डी वॉटर पार्क या धार्मिक,ऐतिहासिक व प्रेक्षणीय पर्यटन स्थळांना भेटी देऊन उत्साहात संपन्न झाली.
शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा व शासनाच्या नियमांना अधीन राहून महामंडळाच्या एस.टी.बसने विद्यार्थ्यांनी प्रवास केला.या सहलीत एकूण १२० विद्यार्थी तर १२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.एकूण ३ बसची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणांची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती गोळा केली.संपूर्ण सहलीत विद्यार्थ्यांच्या मुक्कामाची तसेच भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती.
शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी,मुख्याध्यापक बी.एस.पाटील यांच्या परवानगीने सहलीचे नियोजन करण्यात आले होते.सहल विभाग प्रमुख आर.जे.पाटील,आर.एन.साळुंखे यांनी सहलीचे नियोजन केले.पर्यवेक्षक एस.बी.निकम,शिक्षक प्रतिनिधी ए.डी.भदाणे,उपशिक्षक पी.एस.काटकर, एम.ए.पाटील, राहुल पाटील, एस.आर.चव्हाण, डी.पी.सुरळकर,एन.आर.पाटील,
शिक्षकेतर कर्मचारी आर.ए.मोरे,व्ही.जी.महाले सहलीत सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]